केएफसीने शाकाहारी ग्राहकांसाठी आणले वेज चिकन


अमेरिकन फास्टफूड कंपनी केएफसीने मांसाहारी लोकांच्या जीभा चांगल्याच चाळविल्या असून आज जगभरात हे केंटुकी फ्राईड चिकन लोकांची रसनातृप्ती करत आहे. जगात मोठा वर्ग शाकाहारी आहे. त्यांना टार्गेट करण्यासाठी केएफसी सज्ज झाली असून अमेरिकेतील काही आउटलेटवर कंपनीने प्रथमच वेज म्हणजे शाकाहारी कोंबडी सादर केली आहे. ही शाकाहारी कोंबडी एक दिवस ग्राहकांना खिलविली गेली आणि ग्राहकांच्या पसंतीला हा नवा पदार्थ उतरला का याची चाचपणी केली गेल्याचे समजते.

अर्थात वेज चिकन देणाऱ्या अन्य काही कंपन्या आहेत त्यात वेजले फूड ही एक कंपनी आहे. हे वेज चिकन प्रथिनांची मात्र अधिक प्रमाणात असलेले आणि फॅटचे प्रमाण कमी असलेले आहे. ते सोयाबीन पासून तयार केले जाते. दिसायला आणि चवीला ते एकदम खऱ्या चिकन प्रमाणे आहे. या वेज चिकनमध्ये सोया प्रोटीनचे प्रमाण ३३ टक्के, २२ टक्के फॅट, २१ टक्के कर्बोदके आणि १२ टक्के आर्द्रता आहे. सोयाबीनचे सेवन शरीरासाठी फायदेशीर आहे. त्यामुळे मानसिक संतुलन राखले जाते, मेंदू तल्लख होतो, हृदय विकार दूर होतो आणि याचे रोज सेवन केल्यास रक्तदाब नियंत्रित राहतो, ते यकृतासाठी लाभदायक आहे असा दावा केला जात आहे.

Leave a Comment