उबेरच्या प्रवाशांना आता व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून करता येणार तक्रार


देशभरात 24 तास प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी टॅक्सी बुकिंगची सेवा देणारी उबेर कंपनीने आता हेल्पलाइन सुरु केली आहे. मंगळवारी याबाबत कंपनीने महिती दिली असून ग्राहक या हेल्पलाइनच्या माध्यमातून कोणत्याही वेळी प्रवासादरम्यान गाडी खराब होणे, चालकासोबत वाद, गैरवर्तवणुक याबाबत फोन करुन त्याची तक्रार व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून करता येणार आहे. कंपनीने यापूर्वी हेल्पलाइनमध्ये फक्त टेक्स मेसेज करण्याचे ऑप्शन देण्यात आले होते. पण आता तक्रार करण्यासाठी व्हॉट्सअॅप कॉलची सुविधा प्रवाशाला उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

आपल्या अॅपच्या माध्यमातूनच याबाबत या कंपनीने एक ऑप्शन दिले होते. तसेच प्रवाशाच्या सुरक्षिततेकडे लक्ष देता त्या अॅपमध्ये SOS ऑप्शन देण्यात आला असून आकस्मित स्थितीत तत्काळ पोलिसांना घडलेल्या प्रकाराबद्दल सांगण्याची सुविधा उपलब्ध करुन देतो. मार्चपासून चंदीगढ येथे हेल्पलाइन फिचर प्राथमिक स्वरुपात त्याची चाचणी कंपनीकडून करण्यात आली होती. पण आता देशामधील जवळजवळ 40 शहरात ही उबरने या फिचरची सुविधा प्रवाशांना सुरु करुन दिली आहे.

ही सुविधा अमेरिका आणि कॅनडा मध्ये यापूर्वीच कंपनीने तेथील नागरिकांना उपलब्ध करुन दिली आहे. कंपनीने असे सांगितले आहे की, ही सुविधा सुरुवातील हिंदी आणि इंग्रजी भाषेत प्रवाशाला देण्यात येणार आहे. परंतु ‘उबर लाइटवर’ ही सुविधा उपलब्ध नाही आहे.

Leave a Comment