स्विर्झलँडच्या डोंगरावर खाणकाम करण्यासाठी कोमात्सू एचबी 605-7 हा डंपर वापरला जातो. हा डंपर सर्वात मोठा ई-व्हीकल आहे. ते 65 डन वजन घेऊन चालू शकते. कोमोत्सूचे 6 सिलेंडर इंजिन बदलून याला ई-व्हीकल बनवण्यात आले आहे. हा डंपर आकाराने 30 फूट लांब, 14 फूट रूंद आणि 14 फूट उंच आहे.
या डंपरचा वापर स्विर्झलँडच्या डोंगरावरून चूनखडी आणण्यासाठी केला जातो. यामध्ये 600 किलोवॉटचे स्टोरेज आणि रीजनरेटिव ब्रेकिंग सिस्टम लावण्यात आले आहेत. डोंगरावरून उतरताना डंपर स्वतःच वीज निर्मिती करतो. त्यामुळे डोंगरावरून खाली उतरताना जी उर्जा उत्पन्न होते, ती पुन्हा स्टोर केली जाते.
कंपनीचे प्रवक्त्यांनी सांगितले की, ई-डंपरने रोज 20 वेळा चक्कर मारली तरी देखील त्यातून 200 किलोवॉट तास म्हणजेच 200 युनिट उर्जा उत्पन्न होते. हे ई-डंपर एप्रिलपासून काम करत आहे. या आधारावर मोजले तर आतापर्यंत याद्वारे 76000 लीटर डिझेलची बचत झाली आहे. त्याचबरोबर 200 टन कार्बन डायऑक्साइड देखील निर्माण होण्यापासून वाचला.
स्वतःच वीज निर्मिती करणारे हे आहे जगातील सर्वात मोठे ई-वाहन
फॉर्मुला ई-ड्राइव्हर लुकास डी ग्रासीने सांगितले की, ही एक प्रकारे जादूच आहे की, ट्रक चालण्यासाठी स्वतःच वीजेचे निर्माण करत आहे. इलेक्ट्रिक वाहनांचा हा योग्य उपयोग आहे. हे केवळ स्वस्त नाहीतर अधिक उपयोग आणि इको-फ्रेंडली असणे गरजेचे आहे.