या आहेत भारतीय वायु दलाच्या पहिल्या महिला फ्लाईट कमांडर


नवी दिल्ली – आपल्या देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच हवाई सेनेच्या फ्लाईंग युनिटमध्ये महिला फ्लाईट कमांडरची नियुक्ती करण्यात आली आहे. देशातील पहिली महिला फ्लाईट कमांडर होण्याचा मान वायु दलातील विंग कमांडर ‘एस. धामी’ने मिळवला आहे. ती हिंडन या हवाई तळावरील ‘चेतक हेलिकॉप्टर’ युनिटचे फ्लाईट कमांडरपद सांभाळणार आहे.

महिलांचे सर्व क्षेत्रांप्रमाणेच संरक्षण क्षेत्रातही योगदान हे पुरूषांच्या बरोबरीने होत आहे. आजची महिला ही केवळ स्वतःचेच नाही तर देशाचेही रक्षण समर्थपणे करू शकते, हेच धामीसारख्या महिला दाखवून देत आहेत.

Leave a Comment