लाँच झाली रेनॉल्टची ही शानदार कार, किंमत 5 लाखांपेक्षा कमी


रेनॉल्टने भारतीय बाजारात  ‘ट्रायबर’ ही शानदार कार लाँच केली आहे. ही कार 7 सीट असलेली कॉम्पॅक्ट एमपीवी आहे. कंपनीचा दावा आहे की, ही कार रेनॉ क्विड आणि डस्टरमधील अंतर भरून काढेल. ही कार ह्युंडईची नुकतीच लाँच झालेली ग्रँड आय10 निओस आणि मारूती सुझुकी आर्टिगा यांना टक्कर देईल.

कारच्या किंमतीबद्दल सांगायचे झाले तर सुरूवातीचे वर्जन RXE ची किंमत 4.95 लाख आहे. याशिवाय कार अन्य तीन वर्जनमध्ये देखील उपलब्ध असेल. हे तीन वर्जन RXL,RXT आणि RXZ आहे.  यांची क्रमश: किंमत 5.49 लाख, 5.99 लाख आणि 6.49 लाख रुपये आहे.

कारच्या इंजिनबद्दल सांगायचे तर यामझ्ये 1.0-लीटर, 3-सिलेंडर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे 6250 rpm वर 72 PS पॉवर आणि 3500 rpm वर 96 Nm टॉर्क जनरेट करते. विशेष म्हणजे इंजिनमध्ये 5-स्पीड मॅन्युअल गियरबॉक्स असलेले आहे.

याकारमध्ये तीन लाईनीत 7 सीट आहेत. ड्राइव्हर सीट असणारी लाईन अडजेस्टेबल आहे. दुसऱ्या लाईनीत असलेले सीट स्लाइड करता येतील. याचबरोबर फोल्ड करण्याची देखील सुविधा देण्यात आलेली आहे. तसेच, तिसऱ्या लाइनीतील सीट काढून त्या ठिकाणी सामान देखील ठेवण्यात येऊ शकते.

कारच्या इंटेरिअरमध्ये तुम्हाला ड्यूल-टोन डॅशबोर्डबरोबर 3 स्पोक स्टेअरिंग व्हिल आणि 3.5 इंच स्क्रीनबरोबर 8 इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम देखील मिळेल.

सुरक्षेसाठी कारमध्ये ड्युल-फ्रंट एयरबॅग, ABS, रियर पार्किंग सेंसर आणि स्पीड वॉर्निंग सिस्टम सारखे फिचर्स देण्यात आले आहेत.