या पुणेकरांने पुर्ण केली जगातील सर्वात कठीण मेरॅथॉन


लद्दाखमध्ये पार पडलेल्या ‘ला अल्ट्रा द हाई’ ही 555 किमीची मॅरोथन पुणेकर आशिष कासोडेकर याने पुर्ण केली आहे. ही मॅरोथॉन पुर्ण करणारा तो पहिला भारतीय आहे. ही मॅरोथॉन संपुर्ण जगातील सर्वात अवघड मॅरोथॉन म्हणून देखील ओळखली जाते. दरवर्षी लद्दाखमध्ये या मेरॉथॉनचे आयोजन करण्यात येत असते. यंदाच्या वर्षीपासून मेरॉथॉनचे अंतर 333 किमीवरून 555 किमी करण्यात आले आहे.

पाच जणांनी या स्पर्धेत भाग घेतला त्यातील दोन जण हे भारतीय होते. या स्पर्धकांना 1700 फूट उंचांचे पाच डोंगर चढावे लागले.

आशीष कासोडकरने सांगितले की, अनेक अवघड आव्हानांना मेरॉथॉन दरम्यान सामोरे जावे लागले. हा टास्क अवघड होता त्यामुळे या मेरॉथॉनला जगातील सर्वात भयानक मेरॉथॉन म्हटले जाते.

पहिल्यांदाच 555 किमी मेरॉथॉनचे आयोजन करण्यात आले होते आणि हे मेरॉथॉन पुर्ण करणारा आशिष एकमेव भारतीय आहे. त्याने सांगितले की, याआधीही 333 किमीच्या मॅरोथॉनमध्ये सहभागी झालो होतो त्यामुळे मानसिक दृष्ट्या माझी तयारी झाली होती.

आशिष 2014 पासून मेरॉथॉनमध्ये धावत आहे. अखेर 5 वर्षांनंतर त्याने ही मेरॉथॉन पुर्ण करत विशेष कामगिरी केली.

Leave a Comment