आता बायोपिकच्या माध्यमातून पाहायला मिळणार वाजपेयींचा जीवनकाळ


माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी म्हणजे राजकीय क्षेत्राच्या इतिहासातील एक सुवर्ण पान म्हणून ओळखले जाते. मागील वर्षी १६ ऑगस्ट रोजी अशा महान नेत्याचे निधन झाले. पण आता त्यांचा जीवनकाळ रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. लवकरच त्यांचे आत्मचरित्र असलेल्या ‘द अनटोल्ड वाजपेयी’वर आधारित बायोपिक तयार करण्यात येणार आहे.

‘द अनटोल्ड वाजपेयी’चे हक्क अमाश फिल्म्सचे मालक असलेले शिवा शर्मा आणि जीशान अहमद यांनी खरेदी केली आहेत. आता त्यांच्या आयुष्यातील काही घडामोडी बायोपिकच्या रुपात सादर करण्यात आहे. याबाबत माहिती देताना शिवा शर्मा यांनी सांगितले की माझ्या महत्वाकांक्षी प्रोजेक्ट्सपैकी ‘द अनटोल्ड वाजपेयी एक आहे. पडद्यावर अटलजींचा कार्यकाळ दाखवण्याचा प्रयत्न या बायोपिकद्वारे करणार आहे. त्यांच्याबद्दल बऱ्याच गोष्टी खूप जणांना माहिती नाहीत. मला देखील त्यांचे आत्मचरित्र वाचताना त्यांच्याबद्दल बरच काही जाणून घेता आले. चित्रपटाद्वारे प्रेक्षकांसमोर याच गोष्टी मांडण्याचा आमचा मानस आहे.

अहमद यांनी सांगितले, की सध्या चित्रपटाच्या कथानकावर आता काम सुरू आहे. स्क्रिप्टिंग पूर्ण झाले की आम्ही या चित्रपटातील कलाकारांची नावे जाहीर करू. सध्या तरी या बायोपिकचे नाव ‘द अनटोल्ड वाजपेयी’ असेच राहणार आहे.

Leave a Comment