उधारी देण्यास नकार दिल्याने या पठ्ठयाने बनवले चक्क उधारी खाते अ‍ॅप


ग्राहकांना उधारी सामान देणे दुकानदारांसाठी नेहमीच तोटा ठरत असतो. किराणा दुकानदार दर महिन्याच्या शेवटी ग्राहकांकडून उधारीचे पैसे वसूल करत असतात. अशावेळेस जर लिहिण्यामध्ये एखादी चूक झाली तर दुकानदारांना त्याचा मोठा फटका बसतो.

मात्र आता दुकानदारांना काळजी करण्याचे काहीही कारण नाही. कारण 12 वी मध्ये शिकणाऱ्या अर्जुन अग्रवाल या विद्यार्थ्याने खास उधारी खाते अ‍ॅप (Udhaar Khaata) बनवले आहे. गुरूग्राम येथे राहणाऱ्या व हॅरिटेज एक्सपेरिमेंटल लर्निंग स्कूलमध्ये शिकणाऱ्या अर्जुन अग्रवालने दुकानदारांच्या अडचणी ओळखून हा अ‍ॅप तयार केला आहे. त्याच्या घराशेजारील दुकानदाराने त्याला उधारीवर सामान देण्यास नकार दिला, त्यावेळी अर्जुनच्या डोक्यात हा अ‍ॅप बनवण्याची कल्पना आली.

दुकानदार अनेक ग्राहकांना उधारीवर भरपूर वस्तू देत असतात. अशावेळे ते लिहून ठेवण्यास चूक झाली तर मोठे नुकसान होते. दुकानदारांची हिच अडचण दूर करण्यासाठी हे अ‍ॅप  तयार करण्यात आलेले आहे.

अर्जुनने हार्वर्ड युनिवर्सिटीमधून एक महिने अ‍ॅप डेव्हलपेंटचा कोर्स केला. त्यानंतर एक महिने हा अ‍ॅप  बनवण्यासाठी काम केले. उधारी खाते अ‍ॅप हा त्याचा पहिलाच अ‍ॅप  आहे.

हा अ‍ॅप कोणताही दुकानदार आपल्या मोबाईलवर गुगल प्ले स्टोरमधून डाउनलोड करू शकतो. यामध्ये दुकानदारांना शॉपचे नाव रजिस्टर करावे लागेल. त्यानंतर दुकानदारांना त्यांचे उधारी असणाऱ्या ग्राहकांचे नाव आणि मोबाईल नंबर त्यात टाकावे लागेल.

ग्राहकांच्या खात्यामध्ये रोज खरेदी करणारे सामानांची आधीच यादी करता येते. गरज असेल तेव्हा त्यात बदलही करता येतात. या अ‍ॅपद्वारे ग्राहकांना सामानांचा आणि पेमेंटचा रिमाइंडचा मेसेज पाठवला जाईल. सध्या अ‍ॅप वर पेमेंटची सुविधा नाहीये. हे अ‍ॅप नॉटिफिकेशन प्रमाणे कार्य करेल.

Leave a Comment