भारतीय बाजारपेठेत दाखल होणार हार्ले डेव्हिडसनची नवी इलेक्ट्रिक बाईक


मुंबई : भारतीय बाजारपेठेत एक नवी इलेक्ट्रिक बाईक नुकतीच लॉन्च करण्यात आली आहे. ही नवी बाईक हार्ले डेव्हिडसनची असून ही इलेक्ट्रिक बाईक नुकतीच लॉन्च करण्यात आली आहे. ही बाईक १५६ किलोवॅट लिथियम बॅटरीवर धावते. तर ही बाईक एकदा चार्ज केली की २२५ किलोमीटर धावू शकणार आहे. ही बाईक अवघ्या तीन सेकंदांत शंभरपर्यंतचा वेग गाठू शकते.

हार्लेची इलेक्ट्रिक बाईक पूर्णपणे चार्ज होणारी आहे. ११ ते १३ तासात, पण तुम्ही जर फास्ट चार्जिंगला लावलीत, तर चाळीस मिनिटांत बाईक चार्ज होते. ही बाईक सध्या रोड, स्पोर्ट, रेन, रेंज आणि २ कस्टमाईज अशा ७ मॉडेल्समध्ये उपलब्ध आहे. भारतामध्ये हार्ले डेव्हिडसनची किंमत ५० लाखांपर्यंत आहे. सध्या काळ्या, पिवळ्या आणि केशरी रंगामध्ये ही बाईक उपलब्ध आहे. त्यामुळे हार्लेच्या चाहत्यांनो, तुमच्यासाठी नवी बाईक सज्ज आहे.

Leave a Comment