या राज्यात होणार पहिल्या फ्लाईंग कारचे उत्पादन


नेदरलँडची कंपनी पाल-वी आकाशात उडणाऱ्या कारचे उत्पादन गुजरातमध्ये सुरू करण्याची शक्यता आहे. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी मागील आठवड्यातच कंपनीचे सीईओ रॉबर्ट डिंजेमेंस यांना राज्यामध्ये गुंतवणूक करण्यास आमंत्रित केले आहे. कंपनीला आशियामध्ये व्यवसाय वाढवण्यासाठी योग्य जागेची गरज आहे.

या वर्षीच्या सुरूवातीला झालेल्या वायब्रेंट गुजरात समिटमध्ये नेदरलँडच्या प्रतिनिधी मंडळात रॉबर्ट डिंजेमेंस देखील उपस्थित होते. त्यांनी 2021 पर्यंत भारतात उडणाऱ्या कारची विक्री सुरू करणार असल्याचे म्हटले होते. कंपनीने या क्षेत्रात योग्य भागिदारांबरोबर मिळून कारच्या उत्पादनाची घोषणा केली होती. गुजरात सरकारने कंपनीला गुंतवणुकी संदर्भात योग्य प्रकारे माहिती दिली आहे. गुजरातबद्दल कंपनी सकारात्मक असली तरीही, कंपनी इतर राज्यांमध्ये देखील सर्वेक्षण करत आहे.

कंपनीचे म्हणणे आहे की, 2014 मध्ये उडत्या कारचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढलेला असेल. गुजरात सरकारने कंपनीला प्लांटसाठी जमीन, पाणी, वीज आणि गरज असलेल्या सर्व सुविधा देणार असल्याचा विश्वास देखील दिला आहे.

Leave a Comment