युएईचा पत्रकार म्हणतो, ‘साहो’ पैसा वसूल चित्रपट


‘बाहुबली’ सुपरस्टार प्रभास आणि अभिनेत्री श्रध्दा कपूर यांचा मोस्ट अवेटेड चित्रपट ‘साहो’ येत्या 30 ऑगस्टला रिलीज होणार आहे. जसजशी रिलीजची तारीख जवळ येत चालली आहे, चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढत आहे. मात्र आता युएईमधून चित्रपटाबद्दल प्रतिक्रिया येण्यास सुरूवात झाली आहे.

युएईमधील एंटरटेनमेंट जर्नलिस्ट आणि सेंसर बोर्डाचे सदस्य उमेर संधू यांनी साहो कसा आहे याबद्दल सांगितले आहे.
https://twitter.com/UmairFilms/status/1165924570370646017
https://twitter.com/UmairFilms/status/1166276680865988608
सेंसर बोर्डाच्या स्क्रिनिंगनंतर उमेर यांनी साहोला 4 स्टार दिले आहेत. उमेर यांच्यानुसार, ज्या प्रेक्षकांना धमाकेदार अक्शन, संगीत आणि मसाला चित्रपटांची आवड आहे अशांनी साहो नक्कीच बघितला पाहिजे. उमेर यांनी ट्विट केले की, प्रभासला टक्कर देणारे कोणीच नाही. आता तो पुर्ण भारताचा स्टार आहे.
https://twitter.com/UmairFilms/status/1166276680865988608
https://twitter.com/UmairFilms/status/1164920796789313536
https://twitter.com/UmairFilms/status/1165194094253084677
याआधी देखील उमेर सिंधूने साहोबद्दल ट्विट केले होते. त्यांनी साहोचा पहिला हाफ जबरदस्त आणि प्रभासची एंट्री पैसा वसूल असल्याचे म्हटले होते. उमेर यांनी दावा केला आहे की, हा चित्रपट मागील सर्व रेकॉर्ड तोडून अनेक नवीन रेकॉर्ड तयार करेल. हा चित्रपट ब्लॉकबस्टर असेल.

साहोचे दिग्दर्शन सुजीतने केले आहे. तसेच हा चित्रपट हिंदी, तेलगू आणि तामिळ या तीन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. साहोमध्ये प्रभास, श्रध्दा कपूर यांच्या व्यतरिक्त नील नितीन मुकेश, जँकी श्रॉफ, मंदिरा बेदी, महेश मांजरेकर, चंकी पांडे, अरूण विजय आणि मुरली शर्मा हे देखील दिसणार आहेत.

Leave a Comment