आयआरसीटीसीचे हे नवीन अ‍ॅप देणार पेटीएमला टक्कर


भारतीय रेल्वेची अधिकृत तिकीट बुकिंग सिस्टम आयआरसीटीसीने ऑनलाइन ट्रांजेक्शन सोपे करण्यासाठे IRCTC iMudra डिजिटल वॉलेट लाँच केले आहे.  हे अ‍ॅप गुगल प्ले स्टोरवरून डाउनलोड करता येणार आहे. Paytm, Amazon Pay या वॉलेट अ‍ॅप प्रमाणेच या अ‍ॅपमध्ये फिचर्स आहेत.

या अ‍ॅपचे वैशिष्ट म्हणजे रेल्वे तिकीट रद्द केल्यानंतर ही तुम्हाला रिफंड मिळेल.  या अ‍ॅपद्वारे तुम्ही तिकीट बुकिंग, ऑनलाइन शॉपिंग आणि ट्रांजेक्शन करू शकता.

तुम्ही हे अ‍ॅप मोबाईल, टॅबलेट, कॉम्प्यूटरवर देखील वापरू शकता. या अ‍ॅपद्वारे तुम्ही जलद कॅशदेखील पाठवू शकता, मात्र यासाठी तुम्हाला केवायसी प्रक्रिया पुर्ण करावी लागेल.


अ‍ॅप वापरण्यासाठी प्रक्रिया –
या वॉलेट अ‍ॅपचा वापर करण्यासाठी IRCTC iMudra च्या वेबसाइटवर जाऊन साइन इन करावे लागेल. त्यानंतर मोबाईल नंबरला ओटीपीद्वारे वेरीफाई करावे लागेल.

रजिस्ट्रेशन प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर तुम्ही वर्चुअल आणि फिजिकल कार्ड वापरू शकता. याचा वापर करून तुम्ही ऑफलाइन पेमेंट देखील करू शकता.

IRCTC iMudra डिजिटल वॉलेट हे प्रीपेड कार्ड प्रमाणे आहे, ज्याचा वापर तुम्ही ऑनलाइन ट्रांजेक्शनसाठी करू शकता. तुम्ही क्रेडिट कार्ड सेक्शनमध्ये जाऊन प्रीपेड कार्डची डिटेल्स भरल्यावर याचा वापर करू शकता.

RCTC iMudra डिजिटल वॉलेटच्या वर्चुअल कार्डला Rs 10 पासून आणि फिजिकल कार्डत Rs 200 पासून कमीत कमी रीचार्ज करू शकता.

Paytm प्रमाणेच KYC प्रक्रिया पुर्ण केल्यावर तुम्हाला 1,00,000 रूपयांची लिमिट मिळते. KYC प्रक्रिया पुर्ण नाही केली तर 10,000 रूपयांची लिमिट आहे.

Leave a Comment