स्पर्धकाने अमिताभ बच्चन यांच्या ‘टिंडर’ प्रश्नावर दिले भन्नाट उत्तर


अमिताभ बच्चन सध्या कौन बनेगा करोडपती सिझन 11 मुळे चर्चेत आहेत. मंगळवारी त्यांनी नितीन कुमार या स्पर्धाबरोबर खेळाची सुरूवात केली. जबलपूरमध्ये राहणारा नितीन कुमार सध्या युपीएससीची तयारी करत आहे आणि तो आपल्या आईचे जनरल स्टोर देखील चालवतो. या भागात अमिताभ बच्चन यांनी नितीनला अनेक मजेशीर प्रश्न विचारले. अमिताभ बच्चन यांनी विचारलेल्या एका प्रश्नाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे.

नितीनला विचारण्यात आलेला पहिला प्रश्न हा डिंपल्सबद्दल होता. यावरच बोलताना अमिताभ बच्चन त्याची मस्करी करत होते.  बच्चन यांनी त्याला विचारले की, कधी डिंपल आवडले आहे का ? यावर उत्तर देताना नितीन म्हणाला की, तो कॉस्मेटिक्स आणि ज्वेलरी देखील विकतो, त्यामुळे रोज अनेक महिला समोर येत असतात. यावर अमिताभ बच्चन यांनी देखील त्याच्याशी मस्करी केली.

अमिताभ बच्चन यांनी गप्पा मारता मारता नितीनला विचारले की, टिंडर अपबद्दल माहितीये का ?,  हा प्रश्न ऐकून नितीन देखील लाजला. त्याने सांगितले की, एका मित्राने त्याला टिंडरबद्दल सांगितले होते. यानंतर नितीनला टिंडर काय आहे आणि ते कसे काम करते याबद्दल सांगावे लागले. यावर नितीन उत्तर देतो की, ‘चाललेच नाही आणि गरजही पडली नाही. माझे दुकानच टिंडर आहे.’

या उत्तराने अमिताभ बच्चन आणि तेथे उपस्थित असलेल्या प्रेक्षकांना देखील हसू आले. नितीन कुमारने या खेळात 3,20,000 रूपये जिंकले.

Leave a Comment