या पठ्ठ्याने ८५ व्या वर्षी क्रिकेट निवृत्तीची केली घोषणा


भारताच्या क्रिकेटवेडाविषयी वेगळे बोलण्याची गरज नाही. सध्या टीम इंडियाचा विकेटकीपर आणि माजी कप्तान धोनी खेळातून कधी निवृत्त होणार याची जोरदार चर्चा सुरु आहे कारण तो ३८ वर्षांचा झाला आहे. या खेळातून फलंदाज साधारण ३८-४० ला तर गोलंदाज त्याही अगोदर निवृत्ती घेतात असे दिसते. मात्र वेस्ट इंडीजचा वेगवान गोलंदाज आत्ता वयाच्या ८५ व्या वर्षी क्रिकेट निवृत्तीचा विचार करत असून आणखी दोन आठवडे खेळून तो निवृत्त होणार आहे. या गोलंदाजाचे नाव आहे सेसिल राईट.


हे महाशय जमैकाकडून गॅरी सोबर्स, वेस हॉल या सारख्या दिग्गज खेळाडूंच्या विरोधात प्रथम श्रेणीच्या सामन्यात बार्बाडोस विरुद्ध १९५८ मध्ये खेळले ते अजून क्रिकेट मैदानावर आहेतच. १९५९ मध्ये सेसिल इंग्लंडला सेन्ट्रल लँकशायर लीग क्रोम्पटोन साठी खेळण्याकरता गेले आणि व्यावसायिक क्रिकेटर बनले. नंतर त्यांनी तेथेच स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. विव्हियन रिचर्डस, जोएल गार्नर यांच्याबरोबर ते खेळले आहेत.

त्यांच्या क्रिकेट करियरला ६० वर्षे पूर्ण झाली असून आत्तापर्यंत त्यांनी ७ हजार विकेट घेतल्या आहेत. आज वयाच्या ८५ व्या वर्षी ते त्याच्या करीयरची शेवटची मॅच ७ सप्टेंबरला खेळणार आहेत. आपल्या फिटनेसचे श्रेय त्यांनी लँकशायरच्या पारंपारिक भोजन पद्धतीला दिले आहे. ते म्हणाले, मी टीव्ही जास्त पाहत नाही. क्वचित कधी बिअर हेतो. रोज पायी फिरतो आणि फिटनेस साठी वयाचा बहाणा मी कधीच केलेला नाही.

Leave a Comment