जर्मन जागा मिळेल तेथे करताहेत मधमाशी पालन


जागतिक तापमानवाढीमुळे मधमाश्यांची संख्या कमी होत चालल्याचा अहवाल आल्यापासून जर्मनीतील लोकांनी मधमाशी पालन करण्याचा धडाका लावला असून जागा मिळेल तेथे कुठेही हे मधमाशी पालन केले जात आहे. विशेषतः बर्लिन मध्ये ही क्रेझ जास्त असून बर्लिन बी कीपर्स असोसिएशनच्या सदस्य संखेत गेल्या ६ वर्षात प्रचंड वाढ झाली आहे.


या संस्थेचे अध्यक्ष बेनेडिक्ट पोलाजोक म्हणाले सहा वर्षापूर्वी आमचे ९३ हजार सदस्त्य होते ते आता १ लाख २० हजारावर गेले आहेत. शहरातून मधमाशी पालनासाठी जागा कमी आहे म्हणून लोक घराची प्रवेशद्वारे, बाल्कन्या, खिडक्या, मोटरसायकल, घराचे छत, पेट्या, हॉटेलचे सज्जे अश्या ठिकाणी मधमाशी पालन करत आहेत. या लोकांना मधमाशी पालनाचे पुरेसे ज्ञान नाही त्यामुळे ५० व्हॉलींटीअर नेमले गेले असून ते लोकांना मार्गदर्शन करत आहेत. मधुमाशी पालनाचा बाकी लोकांना त्रास होत नाही ना याकडे लक्ष पुरविले जात आहे. मधमाशी पालन करणाऱ्यांना सुरक्षित कपडे वापरण्याचा सल्ला दिला जात आहे.

मधमाशांची कॉलनी तयार करायची असेल तर राणी मधमाशीला एका जागी बसवून ठेवले जाते. तिच्या पाठोपाठ बाकी मधमाश्या तेथे येतात आणि त्यांची वस्ती तयार होते असे समजते.

Leave a Comment