महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. विधानसभा निवडणूक ही ऑक्टोंबर-नोव्हेंबर महिन्यात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. विरोधी पक्षांकडून भाजपला हरवण्यासाठी रणनिती आखली जात असून, आता महाराष्ट्र युवा काँग्रेसने युवकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी एन हटके कॅम्पेन सुरू केले आहे. या कॅम्पेनचे नाव ‘मैं भी नायक…सीएम फॉर अ डे’, असे आहे.
काँग्रेस देत आहे एक दिवस मुख्यमंत्री बनण्याची संधी
या कॅम्पेन अंतर्गत युवकांना राज्याच्या विकासासाठी वेगवेगळ्या कल्पना सांगाव्या लागतील. प्रत्येक जिल्ह्यातील दोन विजेते निवडले जातील व त्यांना ‘विधानसभेचे तिकीट’ देऊन मुंबईला पाठवले जाईल. त्यानंतर त्यातील पाच जणांची निवड केली जाईल. निवड झालेल्या युवकांना जेथे जेथे काँग्रेसचे सरकार आहे, तेथील मुख्यमंत्र्यांबरोबर एक दिवस काम करता येणार आहे. तसेच, विधानसभा निवडणुकीत त्यांच्याकडे महत्त्वपुर्ण जबाबदाऱ्या देखील देण्यात येईल.
महाराष्ट्र प्रदेश युथ काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी सांगितले की, आज बहुतांश युवक हे सोशल मीडियावर फॉरवर्ड झालेले मेसेजवर विश्वास ठेवतात. त्यांना सत्य माहित नसते. त्यामुळे आम्ही आमचे काम त्यांच्यापर्यंत घेऊन जाणार आहोत. हा ग्रामीण आणि शहरी युवकांसाठी मोठा मंच आहे.