चांद्रयान-२ ने पाठवली चंद्राची नवीन छायाचित्रे


बंगळुरू – भारताचे महत्त्वाकांक्षी अशा चांद्रमोहिमेवर निघालेले ‘चांद्रयान-२’ आता चंद्राच्या आणखी जवळ पोहोचले असून चांद्रयान-२ ने चंद्राच्या पृष्ठभागापासून केवळ चार हजार किलोमीटर अंतरावरून घेतलेली, चंद्राची नवीन छायाचित्रे पाठवली आहेत.


जॅक्सन, माच, मित्रा आणि कोरोलेव्ह ही विवरे चांद्रयानाने टिपलेल्या ताज्या फोटोंमध्ये दिसत आहेत. यामधील जॅक्सन या विवराचा व्यास ७१ किलोमीटर आहे. ही छायाचित्रे २३ ऑगस्टला घेण्यात आली आहेत. याआधी, २१ ऑगस्टला चंद्राचा पहिला फोटो चांद्रयान-२ ने टिपला होता, ज्यामध्ये अपोलो विवर दिसत होते.

दरम्यान, ५ सप्टेंबरला चांद्रयान-२ चंद्रावर पोहचणार आहे. चांद्रयान-२ च्या लँडिंगनंतर रोव्हरचा बाहेरचा कॅमेरा सुरू होईल. त्यानंतर तेथील छायाचित्रे मिळू शकतील. लँडिंगनंतर ५.८ तासांनी प्रत्यक्षात परीक्षणाला सुरुवात केली जाणार आहे. इस्रोच्या या वाटचालीकडे केवळ भारताचेच नव्हे तर जगाचेही लक्ष लागले आहे.

Leave a Comment