हुवावे मेट ३० प्रो खास कॅमेरा सेटअप सह येणार


चीनी कंपनी हुवावे त्यांचा नवा मेट सिरीज मधील मेट ३० आणि मेट ३० प्रो खास कॅमेरा सेटअप सह बाजारात लाँच करत असून त्याचे काही फोटो लिक झाले आहेत. त्यानुसार या फोनमध्ये सर्क्युलर कॅमेरा मोड्यूल दिसत असून सर्कलमध्ये चार कॅमेरे रिअरला दिसत आहेत. म्हणजेच या फोनसाठी कंपनी क्वाड कॅमेरा सेटअप देत असून रिअरलाच डावीकडे सर्कलबाहेर एलईडी फ्लॅश दिसतो आहे.

लिक झालेल्या माहितीनुसार या फोनसाठी ४० एमपीचे दोन, ८ एमपीचा एक आणि चौथा थ्रीडी सेन्सर दिला जात आहे. कॅमेऱ्याला ५ एक्स झूम सपोर्ट आहे. फोनसाठी ६.७ इंची अमोलेड स्क्रीन, फास्टचार्जिंग सपोर्ट करणारी ४५०० एमएएच बॅटरी, ८ जीबी रॅम, १२८ जीबी स्टोरेज, डिस्प्ले नॉच, अंडरडिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर, किरीन ९९० चिपसेट असेल. हे डिव्हाइस परर्फोर्मंस अधिक चांगला आणि फास्ट बनविते असे सांगितले जात आहे. फोनला अँड्राईड क्यू वर आधारित इएमयुआय १०ला सपोर्ट करणारी ओएस असेल. हा फोन १९ सप्टेंबरला भारतात लाँच केला जाईल असे संकेत दिले गेले आहेत.

Leave a Comment