बॉलीवूडच्या सिंघमने खरेदी केली देशातील सर्वात महागडी एसयुव्ही


बॉलिवूड अभिनेता अजय देवगणने भारतातील सर्वात महागडी एसयुव्ही खरेदी केली आहे. याआधीही त्याच्या गँरेजमध्ये अनेक शानदार कार आहेत. यामध्ये मर्सिडिज बेंज W115 220डी, मिनी कूपर, BMW Z4, रेंज रोवर वोग सारख्या कार्सचा समावेश आहे. त्याने काही दिवसांपुर्वी पत्नी काजोलला लग्जरी एसयुव्ही ऑडी क्यू7 देखील गिफ्ट केली होती.

अजय देवगणने काही दिवसांपुर्वीच रॉल्स रॉयल कलिनन खरेदी केली आहे. अजयने काही महिन्यांपुर्वीच कलिनन ऑर्डर केली होती, मात्र कस्टमाइजेशनमुळे कारच्या डिलिव्हरीमध्ये उशीर झाला.

कलिनन सर्वात महागड्या एसयुव्हींपैकी एक आहे. याच्या बेस वेरियंट एक्स शोरूम किंमत 6.95 करोड रूपये आहे. कस्टमाइजेशन केल्यावर कारच्या किंमतीत आणखीन वाढ होते.

अजय देवगणच्या आधी उद्योगपती मुकेश अंबानी यांनी देखील कलिनन खरेदी केली होती. सांगण्यात येते की, कलिनन खरेदी करणारे देशातील ते पहिले व्यक्ती होते. त्यानंतर भूषण कुमारने लाल रंगाची कलिनन खरेदी केली.

अजय देवगणच्या कलिननचा रंग हा गडद आहे. अजय देवगण स्वतः गाडीत बसलेला दिसून आला नाही.  त्यांच्या इंस्टाग्राम फॉलोवरने कारचा फोटो शेअर केले आहेत. ऑनलाइन अॅपद्वारे गाडीच्या मालकाचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला तेव्हा ती गाडी अजय देवगणच्या नावावर असल्याचे समोर आले.

माहितीनुसार, रॉल्स कलिनन 17 जुलै 2019 ला अजय देवगणच्या नावावर रजिस्टर झाली आहे. सरकारी नियमांनुसार दर दोन वर्षांनी विमा करणे आवश्यक आहे.

कलिननमध्ये 6.8 लिटर ट्विन चार्जर असणारे 12 पेट्रोल इंजिन आहेत, जे 560 बीएचपी पॉवर आणि 850 एनएम टॉर्क देते. कारमध्ये 8 स्पीड ऑटोमॅटिक ट्रांसमिशन मिळते. या कारमध्ये ऑल व्हिल स्टीयरिंग सिस्टम मिळते, जेणेकरून कमी स्पिडवर टर्निंग रेडियस कमी करण्यास मदत मिळते. कलिनन 0 से 100 किमीचा स्पीड केवळ 5 सेंकदामध्ये पकडते आणि याचा टॉप स्पीड 249 किमी प्रती तास आहे.

Leave a Comment