या भारतीय लष्कर अधिकाऱ्याने पुर्ण केली जगातील सर्वात अवघड सायकलिंग शर्यत


भारतीय सैन्यातील लेफ्टिनेंट जनरल अनिल पुरी हे पहिले असे जनरल बनले आहेत, ज्यांनी फ्रांसची सर्वात जुनी 1200 किमी लांब शर्यत 90 तास सतत सायकल चालवत पुर्ण केली. 56 वर्षीय अनिल यांनी ही शर्यत 23 ऑगस्टला पॅरिस-ब्रेस्ट-पॅरिस अशा पध्दतीने पुर्ण केली.

या शर्यतीत भारताबरोबरच 60 देशांमधील 6500 जण सहभागी झाले होते. यामध्ये भारतातील एकूण 367 जण होते. यामधील केवळ 80 अरडोस ट्रॅक पुर्ण करू शकले. अन्य जणांनी मध्येच शर्यत सोडली. ही सायकलिंग स्पर्धा सर्वाधिक कठिण शर्यती पैकी एक आहे. यामध्ये सहभागी होणाऱ्यांना 31000 फूट उंच चढाई करावी लागते, ही उंची माउंट एव्हरेस्ट चढण्या एवढी आहे. सहभागी होणाऱ्यांना 4 रात्र न झोपता ही शर्यत पुर्ण करावी लागते.  अनिल पुरी हे त्या सहा अधिकाऱ्यांपैकी एक आहेत, ज्यांनी आपल्या करिअरच्या दरम्यान कमीत कमी 1000 किमी अंतर न थांबता पुर्ण केले आहे.

शर्यत पुर्ण केल्यावर अनिल पुरी म्हणाले की, मनुष्याचा मेंदू एक चांगली मशिन आहे. आपल्या मेंदूला उत्साहित ठेवण्यासाठी तीन ते पाच वर्षातून एकदा काहीतरी केले पाहिजे.

त्यांनी सांगितले की, ही शर्यत अवघड होती. शर्यती दरम्यान सहभागी झालेल्यांना अनेक ठिकाणी 35 ते 3 डिग्री सेल्सियसचा सामना करावा लागला. तसेच येणाऱ्या हवेचा देखील सामना करणे देखील अवघड होते, असे त्यांनी सांगितले.

Leave a Comment