आता रेशन कार्डधारकांना कोणत्याही दुकानावर मिळणार रेशन


आता उत्तर प्रदेशमध्ये रेशन वितरण करताना दुकानदारांची मनमानी चालणार नाही. शासनाने शहरी भागात रेशनकार्ड पोर्टेबिलिटी व्यवस्था सुरू केली आहे. रेशनकार्डधारक शहरातील निश्चित केलेल्या कोणत्याही दुकानातून रेशन घेऊ शकणार आहेत. यासाठी केवळ कार्ड दाखवावे लागणार आहे.

गौतम बुध्द नगरमध्ये 140 दुकानांमध्ये ही सुविधा सुरू करण्यात आलेली आहे. यामध्ये नोएडामधील 81, ग्रेटर नोएडा 15, दादरीमध्ये 18, दनकौर 7, जेवर 8, रबुपुरा 4, जहांगीरपुर 5, बिलासपुरमधील 2 दुकानांचा समावेश आहे.

सांगितले जात आहे की, ही व्यवस्था सुरू केल्याने दुकानदारांच्या तक्रारी कमी होतील. तसेच, जे दुकानदार जेवढे अधिक रेशन वितरित करेल, तेवढे त्यांना कमिशन मिळेल.

तसेच, ज्या रेशनकार्डधारकांच्या बोटांचे ठसे मशीन घेऊ शकत नाही, त्यांना त्यांच्या ठराविक दुकानदाराकडूनच प्रत्येक महिन्याला 22,23 आणि 25 तारखेला रेशन घ्यावे लागेल.

जिल्हा पुरवठा अधिकारी आरएस यादव यांनी सांगितले की, या महिन्यापासून शासनाने रेशनकार्ड पोर्टेबिलिटी व्यवस्था सुरू केली आहे. योजनेच्या प्रसारासाठी दुकानदार आणि विभागाच्या कर्मचाऱ्यांना सांगण्यात आलेले आहे.

Leave a Comment