आतापर्यंत ‘या’ सर्वोच्च नागरी पुरस्कारांनी झाला आहे मोदींचा सन्मान


पंतप्रधान नरेंद्र मोदींनी द्विपक्षीय संबंध बळकट करण्यासाठी केलेल्या प्रयत्न केल्यामुळे संयुक्त अरब अमिरातीचे युवराज महम्मद बिन झायेद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘ऑर्डर ऑफ झायेद’ या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित केले. ‘ऑर्डर ऑफ झायेद’ने सन्मानित होणारे मोदी हे पहिले भारतीय आहेत.

संयुक्त अरब अमिरातीच्या ‘ऑर्डर ऑफ झायेद’ या सर्वोच्च नागरी पुरस्काराने नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गौरवण्यात आले आहे. मोदी हे ‘ऑर्डर ऑफ झायेद’ने सन्मानित होणारे पहिले भारतीय आहेत. युएईचे युवराज महम्मद बिन झायेद यांनी पंतप्रधानांना द्विपक्षीय संबंध बळकट करण्यासाठी मोदींनी प्रयत्न केल्याने या पुरस्काराने सन्मानित केले. नरेंद्र मोदींच्या आधी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना २००७ साली, क्वीन एलिझाबेथ दुसऱ्या आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना २०१८ साली या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तसेच पाकिस्तानचे माजी पंतप्रधान परवेझ मुशर्रफ यांनाही २००७ साली हा सन्मान मिळाला होता. मोदींनी या सन्मानासाठी आपण नम्र असल्याचे म्हटले आहे. तसेच वैयक्तितत सन्मानापेक्षा हा देशाच्या सांस्कृतिक ठेव्याचा भाग असून, १३० कोटी भारतीयांना हा पुरस्कार अर्पण करत असल्याचे त्यांनी ट्विट केले. त्याचबरोबर मोदींना याशिवाय अनेक देशांनी सर्वोच्च पुरस्कारांनी देखील सन्मानित केले आहे.

बहरिनचा ‘किंग हमद ऑर्डर ऑफ रेनेसन्स’ हा पुरस्कार नुकताच नरेंद्र मोदींना देण्यात आला. बहरिनचे राजे हमद बीन ईसा बीन सलमान अल खलिफा यांनी हा पुरस्कार देऊन मोदींचा गौरव केला आहे.

अफगाणिस्तानच्या ‘स्टेट ऑर्डर ऑफ गाझी आमीर अमानुल्लाह खान’ या सर्वोच्च नागरी पुरस्काराने देखील नरेंद्र मोदी यांना सन्मानित करण्यात आले होते.

रशियाचा ‘ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यू’ हा सर्वोच्च नागरी पुरस्कारही त्यांना मिळाला आहे.

२०१६ साली ‘ऑर्डर ऑफ अब्दुलअझीझ अल सौद’ हा मुस्लीमेतर सौदी अरेबियाचा सर्वोच्च नागरी सन्मानने मोदींना सन्मानित करण्यात आले.

मोदींना मालदीवमध्ये परदेशी मान्यवरांना दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कारही बहाल करण्यात आला होता. हा सन्मान ‘ऑर्डर ऑफ डिस्टिंग्वुइश रूल ऑफ इझुद्दीन’ या नावाने देण्यात येतो.

मोदींना २०१८ साली पॅलेन्स्टाईनचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘ग्रँड कॉलर ऑफ स्टेट ऑफ पॅलेन्स्टाईन’ हा सन्मान देण्यात आला.

नरेंद्र मोदींना २०१८ साली दक्षिण कोरियाकडून जागतिक पातळीवर समन्वय तयार करणे, आंतरराष्ट्रीय आर्थकारणाला चालना देणे तसेच मानवी विकास व सामाजिक एकतेसाठी केलेल्या प्रयत्नांसाठी ‘सिऊल शांतता पुरस्कार’ देण्यात आला.

Leave a Comment