या दुर्मिळ प्राण्याला वाचवण्यासाठी त्याने नाकारली 20 लाखांची ऑफर


वरिष्ठ पत्रकार आणि वन्यजीव कार्यकर्ते जयंत के दासने काही दिवसांपुर्वीच नष्ट होत चाललेली टोके गेको ही पालीची प्रजाती वाचवली आहे. ही प्रजाती आसाम आणि पुर्वेत्तर राज्यात सापडते. याबाबतची माहिती त्याने ट्विट करत दिली. या सरपटणाऱ्या प्राण्याला शिकाऱ्यांपासून वाचवले. शिकाऱ्यांनी त्याला 20 लाख रूपये देण्याचे देखील मान्य केले, मात्र तो तेथून पळून जाण्यात यशस्वी झाला.

जयंतने लिहिले की, पैसे गमावल्याचे मला दुखः नाही. त्यापेक्षा मी या सरपटणाऱ्या प्राण्याला वाचवले याचा अभिमान आहे. चीन आणि कोरियामध्ये गेको या प्रजातीसाठी लाखो रूपये मोजले जातात. त्यांचा समज आहे की, याद्वारे एचआयव्ही आजार दूर केला जाऊ शकतो. त्यांनी फोटो शेअर करत लिहिले की, गेकोला जंगलात सोडले.

जयंतने सांगितले की, गेको ही प्रजाती आसाम आणि तेथील राज्यांमध्ये सापडते. त्यांना जवळपास 15 करोडमध्ये खरेदी केले जाते. चीन, कोरियाचे अब्जाधीश हा प्राणी विकत घेतात.

सोशल मीडियावर जयंतने शेअर केलेला फोटो व्हायरल होत आहे. लोकांनी जयंतचे प्राण्यांप्रती असलेले प्रेम बघून लोकांनी त्याचे कौतूक केले.


गेको ही एकप्रकारची पाल आहे. कोरड्या हवामानात मोठ्या प्रमाणात ती सापडते. असे म्हटले जाते की, सरपटणारे प्राणी अस्थमा, मधुमेह आणि त्वचेचे आजार ठिक करतात. पुर्वोत्तर राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गेकोची तस्करी केली जाते. त्यांना म्यानमारला घेऊन जातात व तेथून वेगवेगळ्या ठिकाणी पाठवले जाते.

Leave a Comment