युएईने केला मोदींचा सन्मान आणि ट्रोल झाले इम्रान खान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संयुक्त अरब अमिरातीमध्ये ‘ऑर्डर ऑफ झायेद’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पंतप्रधान मोदींना हा सन्मान मिळाल्यानंतर सोशल मीडियावर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना ट्रोल केले जात आहे.

पंतप्रधान इम्रान खान याच वर्षी फेब्रुवारीमध्ये सऊदी अरबचे क्राउन प्रिंस मोहम्मद बिन सलमानचे ड्रायव्हर बनले होते. जेव्हा मोहम्मद बिन सलमान पाकिस्तान दौऱ्यावर गेले त्यावेळी विमानतळावरून इम्रान खान यांनी स्वतः गाडी चालवली होती. त्यानंतर पाकिस्तानच्या एका महिला खासदाराने इम्रान खान यांचा ड्रायव्हर म्हणून उल्लेख केला होता.

सोशल मीडियावर युजर एकीकडे इम्रान खानचा गाडी चालवताना फोटो तर दुसरी बाजूला पंतप्रधान मोदींचा सन्मानित करतानाचा फोटो शेअर करत आहेत. मोदींना हा सन्मान मिळाल्यानंतर सोशल मीडियावर इम्रान खानला ट्रोल केले जात आहे.

एका ट्विटर युजरने लिहिले की, पंतप्रधान मोदींना ‘ऑर्डर ऑफ झायेद’ पुरस्कार मिळत आहे. तर एकीकडे ऑक्सफर्डमध्ये शिकलेला ड्रायव्हर झाला आहे. पाकिस्तानच्या युजर्सनी देखील इम्रान खान यांना ट्रोल केले.

Leave a Comment