कंगाल पाकिस्तानात नवीन गाड्या, वृत्तपत्र आणि नोकऱ्यांवर बंदी


पाकिस्तानची अर्थव्यवस्था सध्या रसातळाला गेली आहे. पाकिस्तानच्या सरकारने नवीन नोकऱ्यांच्या भर्तीवर देखील प्रतिबंध घातले आहेत. डबघाईला आलेल्या पाकिस्तानच्या सरकारने नवीन गाड्या खरेदी करण्यावर देखील बंदी घातली असून, सरकारी कर्मचाऱ्यांना कागदाच्या दोन्ही बाजूंचा वापर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

इम्रान खान यांच्या कार्यकाळात पाकिस्तानमध्ये आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात होत आहे. एफएटीएफच्या एशियन पॅसिफिक ग्रुपकडून पाकिस्तानला ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्यात आले आहे. त्यानंतर इम्रान खानचे सरकार अर्थव्यवस्था वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहे.

पाकिस्तान सरकारने याआधीच बैठकी दरम्यान चहा, बिस्किट सारख्या गोष्टींवर प्रतिबंध घातले आहेत. इम्रान खान यांच्या सरकारने मंत्रालयाच्या टीकेकडे दुर्लक्ष करत शुक्रवारी आर्थिक वर्ष 2019-20 साठी खर्च कमी करण्यासाठी काही आदेश जारी केले आहेत. हे आदेश पुढील प्रमाणे आहेत –

  1. मोटरसायकल सोडून कोणतेही वाहन खरेदी करता येणार नाही.
  2. विकास योजनासाठी आवश्यक असलेली पदे सोडून नवीन पदे भर्तीवर प्रतिंबध आहेत.
  3. या आर्थिक वर्षात सर्व सरकारी कार्यालयात पत्रिका, वृत्तपत्र यांची संख्या केवळ एक असेल.
  4. प्रिसिंपल अकाउंटिंग ऑफिसर निश्चित करेल की, वीज, गँस, टेलिफोन, पाणी इत्यादी गोष्टींचा वापर योग्यरित्या होईल. तसेच, सरकारी मालमत्ता खरेदी देखील एका निश्चित मर्यादेतच करता येईल.
  5. सर्व अधिकृत पत्रव्यवहार हे कागदाच्या दोन्ही बाजू वापरून करण्यात येईल.

Leave a Comment