सिंधूचा सुवर्णवेध, आईला वाढदिवसाचे दिले गिफ्ट


भारताची स्टार शटलर पीव्ही सिंधू हिने रविवारी भारताच्या बॅडमिंटन इतिहासात सुवर्णक्षणाची नोंद करताना जागतिक विजेतेपद मिळविले आहे. तिने स्वित्झर्लंडच्या बासेल येथे झालेल्या जागतिक बॅडमिंटन विजेतेपदाच्या अंतरिम फेरीत जपानच्या नोजोमी ओकुहारा हिला पराभूत केले आणि हा सामना २१-७, २१-७ असा दोन सेटमध्ये केवळ ३८ मिनिटात खिशात घातला. भारतीय बॅडमिंटनच्या ४२ वर्षाच्या इतिहासात सिंधू हा खिताब मिळविणारी पहिली भारतीय खेळाडू ठरली. याच स्पर्धेत तिने २०१७, २०१८ मध्ये रजत पदक जिंकले होते तर २०१३-१४ मध्ये कांस्य पदकाची कमाई केली होती.

रविवारी सिंधूच्या आईचा वाढदिवस होता. याच दिवशी सिंधूने जागतिक विजेतेपदाला गवसणी घालून मिळविलेले सुवर्णपदक आईला वाढदिवसाची गिफ्ट म्हणून अर्पण करत असल्याचे सांगितले. सिंधू जागतिक क्रमवारीत ५ व्या स्थानावर होती तर ओकूहारा चौथ्या स्थानावर होती. आत्तापर्यंत या दोघी १६ सामन्यात एकमेकींच्या समोर आल्या असून त्यात सिंधूने ९ वेळा ओकुहाराला पराभूत केले आहे. जागतिक विजेती बनलेल्या सिंधूचे पंतप्रधान मोदी यांनी कौतुक करून तिचे अभिनंदन केले आहे. क्रीडाक्षेत्रातील अनेकांनी सिंधूचे अभिनंदन केले आहे. जागतिक विजेतेपद स्पर्धेत दोन पदकांसह परतण्याची भारतीय खेळाडूंची ही दुसरी वेळ आहे. या स्पर्धेत बी साई प्रणीत यानेही कांस्य पदकाची कमाई केली आहे.

यापूर्वी साईना नेहवालने २०१५ मध्ये अंतिम फेरीत रजत पदक जिंकले होते. प्रकाश पदुकोन यांनी १९८३ मध्ये कांस्य पदक जिंकले होते. २०१७ मध्ये साईनाने कांस्य तर सिंधूने रजत पदक मिळविले होते.

Leave a Comment