वाहतूक दबाव झेलण्यात मुंबई जगात आघाडीवर


भारताच्या आर्थिक राजधानी मुंबईने आणखी एक रेकॉर्ड नोंदविले आहे. जगातील सर्वाधिक वाहतूक दबाव झेलाव्या लागणाऱ्या ४०३ शहरात मुंबईने प्रथम क्रमांक मिळविला आहे. टॉमटॉम या लोकेशन टेक्नोलॉजी कंपनीने या संदर्भात ५६ देशातील ४०३ शहरांचे सर्व्हेक्षण केले त्यातून ही बाब समोर आली आहे. ही कंपनी उबर आणि अॅपल यांच्यासाठी नकाशे तयार करण्याचे काम करते.

या सर्व्हेक्षणात नेहमी वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत असलेली देशाची राजधानी दिल्ली चार क्रमांकावर आहे. मुंबई मध्ये पिक अवरला लोकांना त्यांच्या नियोजित ठिकाणी पोहोचण्यासाठी सरासरी ६५ टक्के अधिक वेळ लागतो असे दिसून आले आहे. सकाळी ८ ते १० या वेळात हे प्रमाण ८० टक्क्यांवर जाते तर सायंकाळी ८ ते १० या वेळात १०२ टक्क्यांवर जाते. मुंबईत प्रवासासाठी सर्वात चांगली वेळ रात्री २ ते पहाटे ५ ही आहे असेही यात दिसून आले. पिक अवर मध्ये मुंबईत एक किमी रेंज मध्ये सुमारे ५०० गाड्या असतात. या तुलनेत दिल्लीत पिक अवर मध्ये लोकांना नियोजित ठिकाणी पोहोचण्यासाठी ५६ टक्के जादा वेळ लागतो असे दिसून आले आहे.

Leave a Comment