लक्ष्मीचे वाहन घुबड आहे बुद्धिमान पक्षी


घुबडाचे दर्शन भारतात अशुभ मानले जाते आणि लोक घुबडाला घाबरतात. पण काही देशात घुबड शुभ मानले जाते. हा पक्षी दिसायला भीतीदायक असला तरी अतिशय बुद्धिमान आहे आणि म्हणूनच कदाचित धनाची देवी लक्ष्मी हिने त्याची स्वतःचे वाहन म्हणून निवड केली असावी. घुबडांच्या समूहाला पार्लमेंट असा शब्द आहे. या घुबडाची अनेक वैशिष्टे आहेत जी अन्य पक्षी गणात दिसत नाहीत. हा एकमेव असा पक्षी आहे जो निळा रंग पाहू शकतो. घुबड त्याची मान २७० अंशात वळवू शकते आणि त्याचे डोळे त्याच्या मेंदूएवढे मोठे असतात पण ते चारीबाजूला फिरू शकत नाहीत. घुबड कोणत्याची वस्तूची थ्री डी इमेज पाहू शकते.


घुबड एका वर्षात १०० उंदराचा फडशा पाडते पण शिकार करताना ते शिकार पाहून नाही तर त्या प्राण्याच्या आवाजावरून करते. घुबड त्याची जी पिले बळकट असतील त्यांना प्रथम अन्न देते आणि दुबळ्या पिलांना नंतर अन्न देते. माणूस ऐकू शकणार नाही इतका बारीक आवाज घुबड ऐकू शकते. उंदीर, साप, खारी, मासे, छोटी घुबडे हे त्याचे खाद्य असून त्याला दात नाहीत. ते भक्ष गिळते.


जगात घुबडांच्या २०० हून अधिक जाती आहेत. त्यातील सर्वात छोट्या जातीतील घुबडाचे वजन ३१ ग्रॅम इतकेच असते तर सर्वात मोठ्या घुबडाच्या पंखांची लांबी ५ फुटापर्यंत असते आणि त्याचे वजन साधारण अडीच किलो असते. घुबड याचे कान आवाजाच्या दिशेने फिरवू शकते. एखाद्या तगड्या माणसाच्या फटक्यात जी ताकद असेल त्यापेक्षा अधिक फोर्सने घुबड पंजा मारू शकते. घुबडाचे सरासरी आयुष्य ३० वर्षे आहे. भारतात घुबडाच्या शिकारीला बंदी आहे. प्राचीन काळापासून घुबड लोकप्रिय आहे. फ्रांस मध्ये ३० हजार वर्षापूर्वीच्या पेंटिंग मध्ये घुबडाचे चित्र रेखाटले गेले आहे.

जगात ६ कोटी वर्षापूर्वीचे घुबडाचे जीवाश्म सापडले आहेत. घुबडाच्या पंखांवर मुलायम थर असतो त्यामुळे घुबड उडत असले तरी त्याच्या पंखांचा आवाज येत नाही. घुबड दिवसा झोपते, रात्री जागते. युके मध्ये घुबड पाळता येते पण युएसए मध्ये त्याला बंदी आहे. भारतात घुबडाची किंमत ६० हजार रुपयांच्या घरात असून त्याचा वापर काळी जादू करण्यासाठी केला जातो. त्याच्या शरीरापासून औषधे बनविली जातात तर मलेशियात घुबडाचे मास आवडीने खाल्ले जाते.

Leave a Comment