मोदींचा आवाज बनलेला मोहित रातोरात प्रसिद्धीच्या झोतात


बेअर ग्रील्स सोबत डिस्कव्हरीवरच्या मॅन व्हर्सेस वाईल्ड शो मध्ये भारताचे प्रांत्प्रधान सामील झाले आणि आणि या शोने रेटिंगचे रेकॉर्ड नोंदविले. या शोच्या मराठी व्हर्जन मध्ये मोदींसाठी आवाज देणारा २९ वर्षाच्या मोहित निनाद यामुळे रातोरात प्रसिद्धीच्या झोतात आला आहे. विशेष म्हणजे मीरा रोडचा रहिवासी असलेला मोहित मोदी यांचा मोठा चाहता नाही आणि हे काम करण्याची संधी त्याला अचानक मिळाली. कार्यक्रमाच्या अगोदर १ आठवडा मोहितला या कामासाठी मिळाला होता.

मोहित सांगतो, तो व्हॉइसकव्हर म्हणून काम करतो आणि यापूर्वीही त्याने अनेक ठिकाणी त्याचा आवाज दिला आहे. तो अमेरिकन डिगर यासाठी मुंबई स्टुडीओ मध्ये हिंदी एपिसोड साठी डबिंग करत होता तेव्हा तिथे मॅन व्हर्सेस वाइल्डचे प्रोड्युसर आले होते. त्यांनी मोदी याच्यासाठी मराठी आवाज बनतील अश्या अनेक कलाकारांच्या चाचण्या घेतल्या होत्या पण त्यांना योग्य आवाज मिळत नव्हता. तेव्हा त्यांनी मोहितला या कामासाठी कुणी मिळतेय का बघा असे सांगितले. तेव्हा मोहितने स्वतः ऑडीशन दिली आणि मोदींना मराठीसाठी आवाज मिळाला.


मोहित सांगतो, मोदींचे वय लक्षात घेऊन डबिंग करताना माझा आवाज त्या वयाचा वाटेल याची काळजी घ्यायची होती. त्याने मोदींची भाषणे आणि प्रचारसभा ऐकल्या होत्या. पण या शोसाठी जोरकस आवाजाची गरज नव्हती तर मोदी इतर वेळी जसे बोलतात तसे मित्रत्वाचे, संवाद वाटेल असे बोलणे आवश्यक होते. त्यांची शरीरबोली लक्षात घेऊन हे काम करावे लागत होते. मोदींसाठी आवाज द्यायचा आहे याचा थोडा दबाव होता कारण काम एकदम बिनचूक होणे गरजेचे होते. मात्र मोहितने हे काम फक्त दोन तासात पार पाडले. त्यामुळे रातोरात त्याला खूपच प्रसिद्धी मिळाली. अर्थात याचा आनंद व्यक्त करताना मोहित म्हणतो, हे माझे सर्वोत्तम काम नाही कारण यापूर्वी मी अजून चांगले काम केले आहे. अर्थात मोदींसाठी आवाज द्यायला मिळाला याचा आनंद वेगळा आहे.

Leave a Comment