तुम्ही पाहिला आहे का प्रभास आणि रवीनाचा ‘टीप टीप’ डान्स

बाहुबली सुपरस्टार प्रभासचे लाखो फॅन्स आहेत. मात्र प्रभास हा रवीना टंडनचा सर्वात मोठा फॅन आहे. प्रभास साहो या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार असून, हा चित्रपट 30 ऑगस्टला रिलीज होणार आहे. याच निमित्ताने प्रभास आणि श्रध्दा कपूरने डान्स शो नच बलिये 9 च्या सेटवर हजेरी लावली.

यावेळी प्रभासने रवीना टंडनबरोबर 1994 मध्ये आलेल्या मोहरा या चित्रपटातील टीप टीप बरसा या गाण्यावर डान्स देखील केला. स्टार प्लसने या डान्सचा व्हिडीओ शेअर केला. दोघांचाही डान्स करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला.

साहोच्या निमित्ताने प्रभास आणि श्रध्दा कपूर पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत. या चित्रपटाबरोबर श्रध्दा तेलगू फिल्म इंडस्ट्रीमध्ये डेब्यू करणार आहे. हा चित्रपट हिंदीसह तमिळ आणि तेलगू भाषेमध्ये रिलीज होणार आहे.  प्रभास आणि श्रद्धा बरोबरच या चित्रपटात नील नितिन मुकेश, चंकी पांडे, महेश मांजरेकर जॅकी श्रॉफ, मंदिरा बेदी आणि अरूण विजय यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुजितने केले आहे.

Leave a Comment