हे पुस्तक वाचल्यामुळे ट्रोल झाला विराट

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामान्यातील पहिल्या डावात कर्णधार विराट कोहली चांगली कामगिरी करू शकला नाही. असे असले तरी विराट कोहली सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. यावेळी विराट कोहली मॅचदरम्यान पुस्तक वाचत असल्याने चर्चेत आला आहे.

https://twitter.com/jaybhavsar4/status/1164911158307905536

लवकर आउट झाल्याने विराट पेवेलियनमध्ये परतला. त्यानंतर तो स्टीवन सिलवेस्टर यांनी लिहिलेले  ‘डेटॉक्स योर इगो: सेवन इजी स्टेप टू अचिविंग फ्रिड्म, हॅप्पीनेस अँन्ड यश इन योर लाइफ’ हे पुस्तक वाचताना दिसला. सोशल मीडियावर विराटचा हे पुस्तक वाचतानाचा फोटो व्हायरल झाल्यावर युजर्सनी देखील भन्नाट कमेंट्स केल्या.

पहिल्या पारीत विराटने केवळ 9 धावा केल्या. तो शैनन गॅब्रियलच्या गोलंदाजीवर बाद झाला. विराट कोहली बाद झाल्यानंतर अजिंक्य रहाणे (81 धावा) आणि रविंद्र जडेजा (58 धावा) यांच्या कामगिरीच्या जोरावर भारताने 297 धावांपर्यंत मजल मारली. तर भारतीय गोलंदाजांसमोर वेस्ट इंडिजच्या संघाने दुसऱ्या दिवशी 8 विकेट्स गमावत 189 धावा केल्या.

Leave a Comment