किम जोंगने बनविले नवीन सुपर रॉकेट

उत्तर कोरियाने हुकूमशाह किम जोंग उनच्या उपस्थितीत आज नवीन सुपर लार्ज मल्टीपल रॉकेट लाँचरचे यशस्वी चाचणी केली. या आधी शनिवारी देखील दोन क्षेपणास्त्राची चाचणी करण्यात आली होती.

पुर्व सागरात या दोन क्षेपणास्त्राची चाचणी करण्यात आली. ही दोन जवळच्या अंतरावर मारा करू शकणाऱ्या क्षेपणास्त्रे होती. साउथ कोरियन जॉइंट चीफ ऑफिसरनुसार, दोन्ही क्षेपणास्त्रांची क्षमता 380 किमीपर्यंत मारा करण्याची आहे. तसेच ही क्षेपणास्त्रे 97 किमी उंच मारा करू शकतात.

दक्षिण कोरिया आणि अमेरिकेने 5 ते 20 ऑगस्टच्या दरम्यान युध्द अभ्यास केला होता. यामुळेच उत्तर कोरियाने क्षेपणास्त्रांची चाचणी केली. उत्तर कोरियाने म्हटले होते की, अमेरिका आणि दक्षिण कोरिया यांच्यामध्ये सुरू असलेल्या युध्द अभ्यासामुळे ते नाराज असून, याच कारणामुळे चाचण्या केल्या जात आहेत. तर अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले होते की, किम जोंग उन यांना क्षेपणास्त्रांची चाचणी केल्याने आनंद मिळतो.

Leave a Comment