नेटफ्लिक्स सारख्या सेवांमुळे केबल आणि डीटूएच कंपन्यांचा उठला बाजार

नेटफ्लिक्सबरोबर अन्य ओवर द टॉप प्लॅटफॉर्म हळूहळू भारतीय बाजारातील केबल टिव्हीचा बिझनेस संपुष्टात आणत आहे. केपीएमजीच्या रिपोर्टनुसार, वर्ष 2019 च्या चौथ्या तिमाहीपर्यंत केबल आणि सेटेलाईटच्या एक्टिव स्बस्क्राईबर्सची संख्या 1.2 ते 1.5 ने कमी झाली आहे. रिपोर्टनुसार, आर्थिक वर्षात स्बस्क्रिप्शन रेवेन्यू 8.1 टक्क्यांनी वाढून 463 अब्ज रूपयांपर्यंत पोहचले आहे.

केपीएमजीने आपल्या रिपोर्टमध्ये सांगितले आहे की, 2018 च्या शेवटी डिजीटल केबल सेगमेंटमध्ये 19.7 करोड युजर्सची वाढ झाली. मात्र शेवटच्या तिमाहीपर्यंत याचे एक्टिव युजर्स 1.2 ते 1.5 करोडने कमी झाले आहेत. नवीन टेरिफ ऑर्डरमुळे युजर्सने मनोरंजनाचे इतर प्लॅटफॉर्म ओटीटी सारखे स्बस्क्रिप्शन घेतले आहे. तसेच नियमांमध्ये बदल झाल्याने देखील केबलच्या बिलामध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे अनेक युजर्स हा प्लॅटफॉर्म सोडून जात आहेत. 2018 च्या तुलनेत 2019 मध्ये युजर्सच्या संख्येत घट झाली आहे.

नेटफ्लिक्सने आपल्यो ओरिजिनल कंटेंटसाठी दरवर्षी 600 करोड रूपये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. तर अँमेझॉन प्राइमने 2017 मध्ये 2,230 करोड रूपये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला होता. अनेक ओरिजिनल सिरिजच्या एका एपिसोडसाठी अमेझॉन आणि नेटफ्लिक्स 1 ते 2 करोड रूपये खर्च करतात.

Leave a Comment