नासा करणार अंतराळात झालेल्या पहिल्या गुन्ह्याची चौकशी

पृथ्वीवर एखाद्या ठिकाणी गुन्हा घडला नाही, अशी जागा शोधूनही सापडणार नाही. मात्र आता अंतराळात देखील पहिल्या गुन्ह्याची नोंद झाली आहे. अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था (नासा) या गुन्ह्याचा तपास करणार आहे. अंतराळामध्ये झालेला हा पहिलाच गुन्हा आहे.

अंतराळवीर ऐन मॅकक्लेनवर आरोप आहे की, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशनवरील सहा महिन्यांच्या मिशनदरम्यान पुर्व पत्नीचे खाजगी आर्थिक रेकॉर्ड तपासले आणि न सांगता बँकेचे रिपोर्ट देखील एक्सेस केले.

अंतराळवीराची पत्नी समर वॉर्डेनने या वर्षाच्या सुरूवातीला फेडरल ट्रेड कमिशनमध्ये तक्रार केली होती. त्यांना समजले होते की, मॅकक्लेनने त्यांची परवानगी न घेता बँक खाते तपासले आहे. तसेच, वॉर्डेनच्या कुटुंबाने देखील ऑफिस ऑफ इंस्पेक्टर जनरल येथे तक्रार दाखल केली आहे.

मॅकक्लेनच्या वकीलांनी सांगितले की, अंतराळ यात्रीने काहीही चुकीचे केलेले नाही. याआधीही त्याने अनेकदा तिचे रेकॉर्ड तपासलेले आहेत. नासाने या प्रकरणात दोन्ही पक्षांशी संपर्क केला आहे.

ऐन आणि वॉर्डेनने 2014 मध्ये लग्न केले होते. मात्र 2018 मध्ये दोघांनी घटस्फोट घेतला. जर आरोप सिध्द झाला तर अंतराळात झालेला हा पहिला गुन्हा ठरेल.

Leave a Comment