माहीचा नवा लूक पाहून तुम्ही व्हाल हैराण

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने क्रिकेटपासून काहीकाळ ब्रेक घेतला असला तरी धोनी अनेक कारणांमुळे चर्चेत आहे. काही दिवसांपुर्वी धोनी सैन्याबरोबर काश्मीरमध्ये कार्यरत होता. त्यानंतर आता जयपूर विमानावर त्याच्या चाहत्यांनी त्याचे जोरदार स्वागत केले. यावेळी धोनीचा डोक्याला काळा रूमाल बांधलेला लूक चांगलाच चर्चेचा विषय ठरला. धोनीच्या या लूकचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले.

विश्वचषकानंतर धोनी क्रिकेटमधून निवृत्ती घेईल, अशा चर्चा सुरू होत्या. मात्र याचदरम्यान क्रिकेटपासून काहीकाळ विश्रांती घेत सैन्याबरोबर कार्य करण्याचा निर्णय घेतला. महेंद्रसिंग धोनी लष्कराच्या पॅराशूट रेजिमेंटचा सदस्य असून, त्याच्याकडे लेफ्टनंट कर्नलपद आहे. 2011 मध्ये धोनी लेफ्टनंट कर्नल हे मानद पद मिळालेले आहे. धोनीने मागील आठवड्यातच सैन्याबरोबरच आपला कार्यकाळ पुर्ण केला आहे.

जयपूर विमानतळावर धोनीच्या चाहत्यांनी तुफान गर्दी केली होती. यावेळी त्याची गाडी बाहेर काढण्यासाठी सुरक्षा कर्मचाऱ्यांना चांगलीच मेहनत घ्यावी लागली.

भारतीय संघ सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर असून, भारताने एकदिवसीय आणि टी-20 मालिकेत विजय मिळवला आहे.

Leave a Comment