या अ‍ॅपची गिनीज रेकॉर्डमध्ये नोंद


सिंगापूरची कंपनी बिगो टेक्नोलॉजीचे शॉर्ट व्हिडीओ प्लॅटफॉर्म Likee अ‍ॅपने ‘नो मॅटर वेअर आय एम #IAMINDIAN’ कॅम्पनेच्या दरम्यान भारतातील सर्वात मोठा ऑनलाइन व्हिडीओ अल्बम बनवला असून, यासाठी त्याची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये देखील झाली आहे. 1 लाखांपेक्षा अधिक भारतीयांनी भारताच्या 73 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्तीने मंचावर तिरंगा फडकवला. या कॅम्पेन अंतर्गत भारतीयांनी 2.5 लाखांपेक्षा अधिक व्हिडीओ बनवले, जे 225.3 मिलियन पेक्षा अधिकवेळा बघितले गेले. या कॅम्पेनमध्ये हिमा दासने देखील सहभाग घेतला होता.

केवळ Likee अ‍ॅपवरच नाही तर या कॅम्पेन अंतर्गत बनवण्यात आलेले व्हिडीओ अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर देखील शेअर करण्यात आले. व्हिडीओ शेअर करताना युजर्सनी #IAMINDIAN हॅशटॅग वापरला. हा हॅशटॅग भारतात सर्वाधिक जास्त ट्रेंडिंग होता. केवळ भारतातील नाही तर भारताबाहेर राहणाऱ्या एनआरआय यांनी देखील या कॅम्पेनमध्ये भाग घेतला होता.

बिगो टेक्नोलॉजीचे वाइस प्रेसिडेंट आरोन वेईने या कॅम्पेनबद्दल सांगितले की, गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड नावावर केल्याने आम्ही खूष आहोत. या कॅम्पेनद्वारे लक्षात येते की, देशभक्ती व्यक्त करण्यासाठी शॉर्ट व्हिडीओ प्लॅटफॉर्म योग्य विक्लप आहे.

Likee हा अ‍ॅप 2017 मध्ये भारतात लाँच झाला होता. तसेच हिंदी, तामिळ, मराठी, तेलगू, गुजराती, बंगाली, कन्नड, मल्याळम आणि पंजाबी या भारतीय भाषांमध्ये हा अप उपलब्ध आहे.

Leave a Comment