अब्जाधीशांच्या यादीत भारत तिसऱ्या स्थानी

जगातील सर्वाधिक अब्जाधीशांच्या यादीमध्ये भारत तिसऱ्या स्थानावर कायम आहे. पुढील आठ वर्षांमध्ये या संख्येमध्ये दुप्पट वाढ होण्याची शक्यता आहे. या यादीत पहिल्या स्थानावर अमेरिका कायम आहे.

अफ्रेशिया बैँक ग्लोबल वेल्थ माइग्रेशन रिव्यूनुसार, या यादीत अमेरिका आणि भारताबरोबरच चीनचा देखील समावेश आहे. चीन या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. भारतात सध्या 238 अब्जाधीश आहेत. पुर्ण जगभरात सध्या 2252 अब्जाधीश आहेत. येणाऱ्या काही वर्षांमध्ये ही संख्या 3444 होण्याची शक्यता आहे.

याचबरोबर ब्रिटन 113, जर्मनी 90 आणि हाँगकाँगमध्ये 78 अब्जाधीश आहेत.

भारत हा जगातील सहावा देश आहे जेथे अब्जाधीशांची एकूण संपत्ती 8230 अब्ज डॉलर आहे. अमेरिकेच्या अब्जाधीशांकडे 62584 अब्ज डॉलर संपत्ती आहे. तर चीनमधील अब्जाधीशांची एकूण संपत्ती 24803 अब्ज डॉलर एवढी आहे. जापानच्या अब्जाधीशांकडे 19522 अब्ज डॉलर संपत्ती आहे.

नॉर्वे हा एकमात्र असा देश आहे जेथे 30 ते 35 वर्षांच्या युवकांना सर्वाधिक पगार मिळतो. येथे सरासरी 42 लाख रूपये पगार मिळतो. नॉर्वेमध्ये बेरोजगार युवकांची संख्या सर्वाधिक कमी आहे.

पुर्ण जगभरात जागतिक मंदीचे सावट असताना, नॉर्वेवर कोणत्याही प्रकारचा परिणाम होताना दिसत नाही.

Leave a Comment