वीजेचे बिल भरण्यास तब्बल 1 लाखांची चिल्लर घेऊन गेला

छत्तीसगडमध्ये सध्या वीजेच्या बिलाची मोठी रक्कम न भरणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. बिल न भरल्यास कनेक्शन देखील काढण्यात येत आहे. छत्तीगसगडच्या कोरबा येथील पावर हाऊस रोडवर पवन कुमार नावाच्या व्यक्तीचे कपड्यांचे दुकान आहे. त्यांनी 1 लाख रूपयांचे बिल अद्याप भरलेले नाही. कंपनीने बिल भरण्यास सांगितल्यावर पवन चक्क रिक्षामध्ये दोन पोती चिल्लर घेऊन तुलसी नगर वीजेच्या ऑफिसवर बिल भरण्यास पोहचला. शिक्क्यांनी भरलेली ती पोती बघून कर्मचारी देखील हैराण झाली.

कर्मचाऱ्यांनी शिक्के मोजायला वेळ लागेल, असे कारण सांगत पवनला परत पाठवले व नोट घेऊन येण्यास सांगितले. अखेर त्याने स्वतः जवळ असलेल्या काही नोटा हप्त्याच्या स्वरूपात भरले.

झोन प्रभारी सहायक अभियंता टीआर कोसरियाने सांगितले की, एवढ्या मोठ्या प्रमाणात असलेले शिक्के मोजण्यास अडचण निर्माण झाली होती. त्यामुळे शिक्क्यांच्या ऐवजी नोट आणण्यास सांगितले. शिक्के घेण्यास मनाई करण्यात आलेली नव्हती.

मात्र पवनने दावा केला आहे की, शिक्के घेण्यास नकार देण्यात आला.

Leave a Comment