राजकीय गप्पा नको, गुगलची स्टाफला तंबी


सर्च इंजिन गुगलने त्यांच्या कर्मचारी वर्गासाठी नवी मार्गदर्शक तत्वे म्हणजे गाईडलाईन्स लागू केली आहेत. त्यात गप्पा बंद, मान खाली आणि काम सुरु असा आदेश दिला गेला आहे. गुगल या आदेशपत्रात म्हणते, गुगल मध्ये नोकरी हे अनेकांचे स्वप्न असते हे लक्षात घ्या. राजकारण, ताज्या बातम्या याबाबत ऑफिस मध्ये चर्चा नको, ज्या कामासाठी तुम्हाला नेमले गेले आहे ते काम व्यवस्थित करणे ही तुमची पहिली जबाबदारी आहे. गप्पात वेळ घालवू नका.

गुगलने नवी गाईडलाईन ब्लॉगवर पोस्ट केली आहे. त्यात म्हटले गेले आहे, गुगल मध्ये काम करण्याची संधी ही अनेक आव्हाने घेऊन मिळालेली आहे. जनता आपल्यावर उत्तम गुणवत्ता, विश्वसनीय माहिती यासाठी विश्वास ठेवते. त्या विश्वासाचा आदर करणे व उत्पादने आणि सेवा अखंड देणे हे आपले खरे काम आहे. तुम्ही वापरता त्या शब्दाची जबाबदारी तुमच्यावरच आहे आणि त्याला तुम्हीच उत्तर द्यायचे आहे हे लक्षात घेऊन राजकारणावर गप्पा नकोत. कोणालाही ट्रोल करू नका, कुणाचेही नाव घेऊ नका आणि एखाद्या व्यक्तीला टार्गेट केले जात असलेल्या जाहिरातीचा हिस्सा बनू नका.

कंपनीसंबंधी संभ्रम निर्माण करणारी माहिती कुणाशीही शेअर करू नका तर चांगली माहिती द्या. गुगलवर राजकीय प्रक्षपात केल्याचा आरोप एका सॉफ्टवेअर इंजीनिअर ने केल्यानंतर ही नवी गाईडलाईन जारी केली गेली आहे.

Leave a Comment