पाकिस्तानी दरोडेखोरांची व्हॉटस अप कामगिरी


पाकिस्तानच्या सध्याच्या दयनीय अवस्थेची कल्पना साऱ्या जगाला असली तरी तेथे काही अजब गजब गोष्टी सुद्धा घडत आहेत याची प्रचीती नुकतीच आली आहे. कराची पोलिसांनी एक गुन्हेगार आणि त्याच्या साथीदाराला अटक करून चौकशी केली तेव्हा ही टोळी डीक्यूएम या नावाने एक बेकायदा व्हॉटस अप ग्रुप चालवीत असल्याचे आणि त्याचा उपयोग गुन्ह्याची आखणी करण्यासठी करत असल्याचे उघडकीस आले आहे. डीक्यूएमचा लॉंग फॉर्म डकैत कौमी मुव्हमेंट असा आहे.

या संदर्भात पाकिस्तानच्या जंग वर्तमानपत्राने दिलेल्या बातमीनुसार कराचीत सक्रीय असलेल्या एका दरोडेखोर टोळीने त्यांच्या टोळीतील सदस्याशी संपर्क करता यावा म्हणून एखाद्या सरकारी संस्थेप्रमाणे सामाजिक कार्यक्रम बनविले आहेत. पोलीस चौकशीत असे उघड झाले की या टोळीने परस्पर संपर्कासाठी व्हॉटस अप बनविला असून ग्रुप अॅडमिन कोणता गुन्हा करायचा ती योजना आखत असे आणि टोळीतील ४-५ सदस्य तो करत असत. कॉल डेटाचे रेकॉर्ड राहू नये म्हणून ही टोळी व्हॉटस अपचा वापर करते.

टोळीतील एखाद्या सदस्याला अटक झाली तर त्याला सोडविण्यासाठीचा खर्च टोळी करते तसेच एखादा गुन्हा करताना जखमी झाला तर त्याच्या उपचाराचा खर्च टोळीकडून केला जातो. पोलिसांनी पकडल्यास त्या गुन्हेगाराच्या कुटुंबाचा खर्च टोळी करते असे पोलिसांना चौकशीत समजले आहे.

Leave a Comment