डॉक्टरांनी जागविल्या जेटलींच्या आठवणी


माजी केंद्रीय मंत्री भाजप वरिष्ठ नेते अरुण जेटली यांच्यावर आज म्हणजे रविवारी दुपारी अंत्यसंस्कार केले जात आहेत. जेटलींच्या दु;खद निधनानंतर त्यांना समाजाच्या सर्व स्तरातून श्रद्धांजली वाहिली जात असतानाचा जेटली यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी त्यांच्या आठवणी जागविल्या आहेत.

जेटली यांच्यावर एम्समध्ये उपचार केले जात होते. उपचार करणारे डॉक्टर रणदीप गुलेरिया म्हणाले, जेटली यांचा आजार गंभीर होता मात्र जगण्याची अद्भुत इच्छाशक्ती त्यांच्यात होती. त्यांचा एकेक अवयव निकामी होत होता मात्र जेव्हा ते शुद्धीवर येत तेव्हा त्या परिस्थिती सुद्धा मंद हसून विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देत होते. यापूर्वीही त्यांच्यावर येथे उपचार केले गेले होते. त्यांच्यावर मूत्रपिंड प्रत्यारोपण येथेच केले गेले होते. तेव्हा त्यांनी सर्व रुग्णांना शुद्ध आणि गार पाणी मिळावे यासाठी मशीन्स बसविली तसेच रुग्णांना थंडावा मिळावा म्हणून ५ पेक्षा अधिक कुलिंग मशीन्स बसविली आणि त्याचा खर्च ते त्यांच्या पगारातून करत होते.

अरुण जेटली यांचे जम्मूशी खास नाते होते कारण त्यांच्या पत्नी संगीता या जम्मू कॉंग्रेस नेते माजी खासदार गिरधारीलाल डोग्रा यांची कन्या आहेत. जेटली अखिल विद्यार्थी परिषदेचे काम करत होते तेव्हापासून म्हणजे युवा असल्यापासून जम्मू काश्मीरसाठी लागू केलेल्या ३७० कलमाविरोधात होते. जम्मू निवासियांच्या हितासाठी ते नेहमीच झटले. तेथील समाजाला देशहितासाठी कार्य करत राहा असे आवाहन ते नेहमीच करत असत.

Leave a Comment