युद्ध मैदानावर रंगला तलवार रास गरबा


गुजराथ म्हटले की प्रथम नजरेसमोर येतो तेथील अतिआकर्षक रास गरबा. या नृत्याचे एक नवे वर्ल्ड रेकॉर्ड युद्ध मैदानावर नुकतेच रचले गेले आहे. या मैदानावर २३०० राजपूत मुली महिलांनी एकाचवेळी तलवार हातात घेऊन रास गरबा खेळून शहीदांना अनोखी श्रद्धांजली दिली. या कार्यक्रमाचे माजी लष्कर प्रमुख आणि माजी केंद्रीय मंत्री जनरल व्ही.के. सिंग यांच्या हस्ते उद्घाटन केले गेले.


मिळालेल्या माहितीनुसार सुमारे ४२८ वर्षापूर्वी भूचरमोरी या मैदानावर जंगी युद्ध झाले होते. त्यात बलाढ्य अकबर सेनेला राजपूत योद्धा जाम सताजी याने धूळ चारली होती. हे युद्ध जुनागढचा नबाब मुझफ्फर जामनगर राजाच्या आश्रयाला आला होता त्याला संरक्षण देण्यासाठी लढले गेले होते त्यात अनेक योध्ये शहीद झाले होते. या शहीद जवानांचे स्मरण म्हणून दरवर्षी येथे कार्यक्रम केला जातो. यंदा येथे तलवार रास गरबा खेळला गेला.

अखिल राजपूत युवा संघ कार्यकर्ते महीपतसिंग जडेजा म्हणाले, दरवर्षी राजपूत शौर्य बलिदान स्मरण म्हणून अनेक कार्यक्रम होतात. यंदा १६ जिल्ह्यातील १३ ते ५२ वयोगटाच्या महिलांनी एकत्र येऊन तलवारी सह रासगरबा खेळून विक्रम रचला आहे.

Leave a Comment