जंगलाच्या राजाविषयी काही रोचक माहिती


जंगलचा राजा म्हणजे सिंह. शूर प्राणी म्हणून त्याची आपल्याला ओळख आहे. एकाद्या व्यक्तीने अदम्य साहस दाखविले तर त्याला शेरदिल असे आपण म्हणतो. जंगलाचा हा एकटा राजा वास्तविक मार्जार वर्गातील चित्यानंतरचा दुसरा मोठ्या आकाराचा प्राणी आहे. मात्र त्याचा दरारा असतो तो डरकाळी मुळे. त्याच्या डरकाळीचा आवाज ८ किमीपर्यंत ऐकू जातो याची अनेकांना माहिती नसेल.


सिंह जंगलाचा राजा असला तरी बहुतेकवेळा शिकार करण्याचे काम राणीचे म्हणजे सिंहीणीचे असते. सिंह झेब्रा, जिराफ, रेडे, गेंडे, हिप्पोची शिकार करतातच पण पक्षी, सरपटणारे प्राणी, किडे कीटकही खातात. अगदीच अन्न मिळाले नाही तर हत्तीची शिकार सुद्धा सिंह करतात. दिवसाला सिंहाला साधारण ७ किलो तर सिंहीण साधारण ५ किलो मांस लागते. सिंहाच्या पिलाला कब असा इंग्रजी शब्द आहे.


तरुण सिंह ताशी ८१ किमी वेगाने धावू शकतो. जंगलाचा हा राजा त्यांच्या नैसर्गिक अधिवासात म्हणजे जंगलात १२ ते १७ वर्षापर्यंत जगतो मात्र पाळीव असेल किंवा पिंजर्यात असेल तर २५ वर्षे सुद्धा जगतो. सिंह दिवसाच्या चोवीस तासातील २० तास आराम करतो. सिंहाचे सरासरी वजन १८० किलो तर सिंहीणीचे वजन सरासरी १३० किलो असते पण जगात सिंहाचे सर्वाधिक वजन ३२४ किलो असल्याची नोंद झाली आहे.

भारतात जगातील एकूण सिंह संख्येच्या ७० टक्के सिंह आहेत. सिंह नेहमी टोळी करून राहतो. या टोळीत एकच नर सिंह असतो तर बाकी माद्या आणि बच्चे असतात. सिंहाच्या टोळीला प्राईडस म्हटले जाते.

Leave a Comment