लोकांचे खासगी संवाद ऐकणाऱ्या 300 कर्मचाऱ्यांना अॅपलने दिला नारळ


गूगल, अॅमेझॉन आणि अॅपलच्या आभासी सहाय्यकांबद्दल नेहमीच संभ्रमाचे वातावरण असते. दिवसाआडून अशी बातमी येते की गूगल, अॅमेझॉन आणि अॅपलचे कर्मचारी वापरकर्त्यांची खासगी चर्चा ऐकत आहेत. त्याच वेळी, टेक कंपन्यांनी देखील याची पुष्टी केली आहे की ते कंत्राटदारांद्वारे वापरकर्त्यांची रेकॉर्डिंग ऐकतात. यामागील कंपन्यांनी आभासी सहाय्यक सुधारण्याचे कारण दिले आहे.

त्याच वेळी अॅपलने वापरकर्त्यांच्या गोपनीयतेची जाणीव ठेवून ऑडिओ क्लिप ऐकत असलेले 300 कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकले आहे. कंपनीतून ज्यांना काढण्यात आले ते 300 कंत्राटी कर्मचारी एका शिफ्टमध्ये एक हजार ऑडिओ क्लिप ऐकत असत, जरी या कंत्राटदारांनी स्वत:च्या मर्जीने लोकांची वैयक्तिक चर्चा ऐकली नाही, तर अॅपलने यासाठी त्यांना पैसे देत होती. यापूर्वी गोपनीयता आणि डेटा गळतीमुळे ढासळत चाललेल्या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर अॅपलने हा कार्यक्रम बंद करण्याची घोषणा केली होती.

काही दिवसांपूर्वीच एक अहवाल समोर आला आहे की अॅमेझॉनचा व्हर्च्युअल असिस्टंट अलेक्सा आणि गुगल असिस्टंट वापरकर्त्यांची वैयक्तिक चर्चा ऐकत आहे, तर आता अॅपलच्या असिस्टंटबद्दलही असेच प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अॅपलच्या जुन्या कंत्राटदाराने असा दावा केला आहे की अॅपलही कंत्राटदारांना सिरीद्वारे वापरकर्त्यांचे बोलणे ऐकण्यासाठी पैसे देत होती. अहवालात असे सांगितले जात आहे की कंत्राटदारांनी लोकांच्या बेडरूमपासून डॉक्टरांच्या अपॉईन्टमेंटस सर्वकाही ऐकले आहे.

दरम्यान याआधी देखील अॅमेझॉन आणि गुगलने त्यांच्या असिस्टेंटच्या मदतीने वापरकर्त्यांची चर्चा ऐकण्याचे प्रकरण देखील समोर आले आहे. अ‍ॅमेझॉनने देखील कबूल केले आहे की अॅलेक्साच्या रेकॉर्डिंगचा काही हिस्सा असिस्टेंटला अधिक सुधारित करण्यासाठी ते काही रेकॉर्डिंग ऐकत आहे. वास्तविक, असे आहे की वापरकर्त्यांचे शब्द ऐकून चांगल्या असिस्टेंटसाठी हे सहाय्यक ट्रेंड केले जात आहेत.

Leave a Comment