आता दक्षिण कोरियात रिलीज होणार ‘अंधाधून’


आयुष्मान खुराणा, तब्बूचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेता ‘अंधाधून’ हा चित्रपट आता दक्षिण कोरियातही रिलीज करण्यात येणार आहे. २०१८ साली प्रदर्शित झालेला ‘अंधाधून’ चित्रपट सुपरहिट ठरला होता. या चित्रपटाचे २०१८ मधील हिट चित्रपटातही नाव होते. यंदाचा सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार या चित्रपटाला जाहीर झाला आहे.

भारतात यशस्वी ठरलेला हा चित्रपट चीनमध्येही काही महिन्यांपूर्वी रिलीज करण्यात आला. विशेष म्हणजे ‘अंधाधून’ने भारतापेक्षा तिप्पट कमाई चीनमध्ये केली. ३०० कोटींहूनही अधिकच्या घरात ही कमाई होती. चिनी प्रेक्षकांकडून मिळालेल्या भरघोस प्रतिसादानंतर आता दक्षिण कोरियात हा चित्रपट रिलीज करण्यात येणार आहे.


याबाबतची माहिती चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी दिली असून त्यांनी दिलेल्या महितीनुसार २८ ऑगस्टला हा चित्रपट दक्षिण कोरियात रिलीज करण्यात येणार आहे. हा चित्रपट दक्षिण कोरियातील ९० स्क्रीन्सवर रिलीज करण्यात येणार आहे. श्रीराम राघवन यांनी ‘अंधाधून’चे दिग्दर्शन केले. आयुष्मान खुराना, तब्बू आणि राधिका आपटेची प्रमुख भूमिका या चित्रपटात आहे. मर्डर मिस्ट्रीवर हा चित्रपट आधारलेला आहे.

Leave a Comment