विवेक ऑबेरॉय बनवणार बालाकोट ‘एरिअल स्ट्राइक’वर चित्रपट


भारतीय हवाई दलाने १४ फेब्रुवारीला झालेल्या पुलवामा येथील दहशतवादाला प्रत्युत्तर म्हणून पाकव्याप्त काश्मीरमधील बालाकोट येथे एरिअल स्ट्राइक केला. यात पाकिस्तानात असलेले दहशतवादी तळ उद्धवस्त केले गेले. या एअर स्ट्राइकमध्ये विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांचे नाव भारताच्या इतिहासात अमर झाले. त्यांच्या आणि बालाकोट एअर स्ट्राईकवर आधारित चित्रपट आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

अभिनेता विवेक ओबेरॉय सत्य घटनेवर आधारित असलेल्या या चित्रपटाची निर्मिती करणार आहे. बालाकोट – द ट्रु स्टोरी असे शीर्षक असणाऱ्या या चित्रपटाचे चित्रीकरण जम्मू-काश्मीर, दिल्ली आणि आग्रा या ठिकाणी केले जाणार आहे. हिंदींसह तामिळ आणि तेलुगू या दाक्षिणात्य भाषांमध्येही चित्रपट रिलीज होणार आहे. हा चित्रपट या वर्षा अखेरीस रिलीज केला जाणार आहे.


भारताचे विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांचे मिग-21 विमान पाकिस्तानच्या एफ-16 या लढाऊ विमानाचा पाठलाग करताना चुकून पाकिस्तानच्या हद्दीत गेले होते. अभिनंदन यांनी विमानाला आग लागल्याने पॅराशूटने बाहेर उडी मारली आणि ते पाकव्याप्त काश्मीरमध्ये पडले होते. त्यांना पाकिस्तानने लगेच कैदेत घेतले होते. कैदेत असताना त्यांच्याकडून भारतीय लष्कराची महत्त्वपूर्ण माहिती काढून घेण्यासाठी पाकिस्तानच्या लष्कराने आटोकाट प्रयत्न केला, परंतु अभिनंदन या परिस्थितीतही खंबीरपणे उभे राहिले, त्यांची हीच कथा या चित्रपटात पाहायला मिळेल.

Leave a Comment