कामचुकार आर्किटेक्टला 60 लाखांचा दंड


मागील वर्षीपासून इटलीच्या वेनिस शहरात येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढत आहे. यावर लगाम घालण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र आता शहरातील प्रसिध्द कॉन्स्टिट्यूशन कालव्यावर पुल बांधणाऱ्या आर्किटेक्टवर कारवाई करण्यात आली आहे. पर्यटकांसाठी योग्य प्रतिकूल पूल न बनवल्याने स्पॅनिश आर्किटेक्ट सैंटियागो कैलात्रावावर 86,000 डॉलर (61 लाख रु.) दंड लावण्यात आला आहे. वेनिस प्रशासनाचे म्हणणे आहे की, हा ब्रिज येणाऱ्या पर्यटकांना सांभाळू शकत नाहीये.

इटलीच्या कोर्टाने 9 ऑगस्टला निर्णय देत सांगितले की, आर्किटेक्टने पुलाच्या कामामध्ये चालढकल केली आहे. सैंटियागाने याआधी डलास, टेक्सास आणि कॅलगरी, अल्बर्टा येथे पुल डिजाईन केले आहेत.

300 फूट लांब पोंटे डिला कॉन्स्टिट्यूजीओन ब्रिजचे काम 2008 पासून सुरू होते. या पुलाचे नाव इटलीच्या संविधानाला 60 वर्ष पुर्ण झाल्याच्या निमित्ताने ठेवण्यात आले होते. या पुलाचे निर्माण करताना स्टिल वापरण्यात आले असून, तर बाजूचे किनारे काचेचे आहेत. यामुळे पुल पर्यटकांना सांभाळू शकत नाही. तो धोकादायक आहे.

ही पहिलीच अशी घटना नाही की, ज्यामुळे आर्किटेक्ट सैंटियागो चर्चेत आले आहेत. याआधी 2015 मध्ये त्याच्या शिकागो स्पायर या इमारतीचे काम देखील थांबवण्यात आले होते.

वेनिसमध्ये पर्यटकांच्या संख्येवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण ठेण्यात येत आहे. वेनिसमध्ये आता येणाऱ्या पर्यटकांकडून कर आकारला जाणार आहे. सुरूवातीचा कर हा 3 युरो (230 रूपये) असेल. 2020 पर्यंत हा कर वाढून 10 युरो करण्याचा विचार आहे.

Leave a Comment