अपघातापासून वाचण्यासाठी असा सेट करा गाडीचा साइड मिरर


कार चालवत असताना अनेक वेळा छोट्या छोट्या चुकांमुळे अपघात होऊ शकतो. सर्वसाधारणपणे अपघात होऊ नये म्हणून कारचा स्पीड, लेनमध्ये गाडी चालवावी, दारू पिऊन गाडी चालवू नये अशा गोष्टी सांगितल्या जातात. मात्र अनेकवेळा साइड मिरर व्यवस्थित सेट न केल्याने अपघात होतात.

कार चालवत असताना ड्राइव्हरला मागील ऑब्जेक्ट बघण्यासाठी कारमधील तीन मिरर वापरावे लागतात. एक मिरर कारच्या आतमध्ये असतो, तर अन्य बाहेरील बाजूला उजव्या व डाव्या बाजूला असतात. हे तिन्ही मिरर मागून येणाऱ्या गाडीची पोजिशन सांगतात. जर एखाद्या मिमरची सेटिंग व्यवस्थित केली नाही तर मागून येणारी गाडी व्यवस्थित दिसत नाही. याला ब्लाइंट स्पॉट म्हणतात. यामुळे अनेकवेळा अपघात होतात.

ब्लाइंट स्पॉट –
जेव्हा कोणतीही गाडी आपल्याला ओव्हरटेक करत असते, तेव्हा ते सेंटर मिररमध्ये दिसते. मात्र ती गाडी तुमच्या बाजूला येते तेव्हा साइड मिररमध्ये दिसत नाही, याला ब्लाइंड स्पॉट म्हणतात. मिरर चुकीचे सेट केल्याने असे होते.

कारच्या तिन्ही मिररला अशाप्रकारे सेट करावे की, ज्यामुळे ब्लाइंड मिररपासून वाचता येईल. तसेच सेंटर मिरर अशाप्रकारे सेट करावी की ज्यामुळे कारचा मागील भाग मधोमध दिसेल. तसेच बाजूच्या मिररला देखील अशाप्रकारे सेट करावे की, मागून येणारी कार ओव्हरटेक करत असताना सेंटर मिरर मध्ये दिसण्यास बंद झाल्यानंतर साइड मिररमध्ये दिसेल. अशा पध्दतीने मिरर सेट केल्याने तुमची ड्राइविंग देखील सुधारेल व तुम्ही अपघातापासून देखील वाचाल.

Leave a Comment