चक्क.. दुसऱ्या आकाशगंगेतून पाठवले जात आहे पृथ्वीवर सिग्नल


दुसऱ्या आकाशगंगेतून पृथ्वीवर वारंवार सिग्नल पाठवले जात असल्याचा दावा वैज्ञानिकांकडून करण्यात आलेला आहे. वारंवार येणारे आठ आवाज टेलिस्कोपच्या मदतीने पकडण्यात आले आहेत. याला फास्ट रेडिओ बर्स्टना ‘एफआरबी’ असे म्हटले आहे. या आवाजांचा स्रोत शोधण्यास जर वैज्ञानिक यशस्वी झाले तर हे नक्कीच मोठे यश असणार आहे.

वैज्ञानिकांना 2007 पासून असे ‘एफआरबी’ सापडले आहेत. मात्र यातील केवळ दोनच सिग्नल वारंवार आलेले आहेत. वारंवार येणारे हे सिग्नल संशोधनसाठी महत्त्वाचे ठरणार आहेत. 8 वेळा झालेल्या सिग्नलचा स्फोट हा आवाजाचा स्त्रोत शोधण्यास वैज्ञानिकांना फायदेशीर ठरेल.

वैज्ञानिकांनुसार, हा आवाज आकाशगंगेतून अगदी जवळ आला असण्याची शक्यता आहे. हे सिग्नल कशाचे आहेत हे अद्याप कळू शकलेले नाहीत. कोणत्या कारणामुळे आल्या तेही अद्याप समजू शकलेले नाही. कदाचित ते तारे तुटून ब्लॅक होलमध्ये पडत असतील, अथवा एलियानद्वारे पाठवले जात असतील.

हे सिग्नल कुठे निर्माण झाले व त्यामागील नेमके कारण काय आहे याचा वैज्ञानिक शोध घेत आहेत.

Leave a Comment