आरसीबीने केली गॅरी कर्स्टन यांची हकालपट्टी


मुंबई – न्यूझीलंडच्या ब्रेंडन मॅक्क्यूलमची आयपीएलमधील कोलकाता नाईट रायडर्सने नुकतीच मुख्य प्रशिक्षकपदी निवड केली. त्यानंतर आता याच स्पर्धेतील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (आरसीबी) या संघाने देखील आपल्या संघासाठी नवीन प्रशिक्षकाची निवड केली आहे. आधीचे मुख्य प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांची ही निवड करताना हकालपट्टी केली आहे.

न्यूझीलंडचे माजी प्रशिक्षक माईक हेसन यांना आरसीबीने क्रिकेट कार्यकारी संचालक म्हणून तर ऑस्ट्रेलियाचे माजी फलंदाज सायमन कॅटिच यांना मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले आहे. टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत हेसन हे होते. पण रवी शास्त्री यांची फेरनिवड झाल्याने त्यांना स्थान मिळाले नव्हते. त्यामुळे २०२० च्या आयपीएल हंगामात हेसन आरसीबीचे कार्यकारी संचालक म्हणून काम पाहतील.

मागच्या हंगामातील गोलंदाजी प्रशिक्षक आशिष नेहराला आरसीबी संघाने पुढच्या वर्षासाठी वगळले आहे. आरसीबी संघाला आयपीएलचे एकदाही जेतेपद जिंकता आलेले नाही. याबद्दल संघाचे अध्यक्ष संजिव चूरीवाला म्हणाले, विश्वासू, सन्माननीय आणि चांगली कामगिरी करणारा संघ आरसीबीला बनवण्याचा हेतू आहे. म्हणूनच माईक हेसन आणि सायमन कॅटिच यांची नियुक्ती करताना आम्हाला आनंद होत आहे.

Leave a Comment